पावसाळ्यात पार्टनरसोबत रोमॅंटिक डेटवर जाण्यासाठी खास ठिकाणं, एकदा जाऊन बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 03:08 PM2023-06-28T15:08:28+5:302023-06-28T15:09:22+5:30

Monsoon Romantic Destination : खासकरून कपल्स या दिवसात फिरण्याचा खूप आनंद घेतात. मग ती एक दिवसाची ट्रीप असो वा काही दिवसांची. त्यामुळे अशा लोकांसाठी काही रोमॅंटिक डेस्टिनेशनची लिस्ट आम्ही घेऊन आलो आहोत.

Monsoon Special : Destination list for a perfect romantic vacation in Monsoon | पावसाळ्यात पार्टनरसोबत रोमॅंटिक डेटवर जाण्यासाठी खास ठिकाणं, एकदा जाऊन बघाच!

पावसाळ्यात पार्टनरसोबत रोमॅंटिक डेटवर जाण्यासाठी खास ठिकाणं, एकदा जाऊन बघाच!

googlenewsNext

Monsoon Romantic Destination : नुकतीच पावसाला रिमझिम सुरूवात झाली. अशात पाऊस एन्जॉय करणारे हौशी लोक यावेळी कुठे फिरायला जायचं याचं प्लॅनिंग करत असतील. पावसाळा अनेकांना रोमॅंटिक वाटतो. खासकरून कपल्स या दिवसात फिरण्याचा खूप आनंद घेतात. मग ती एक दिवसाची ट्रीप असो वा काही दिवसांची. त्यामुळे अशा लोकांसाठी काही रोमॅंटिक डेस्टिनेशनची लिस्ट आम्ही घेऊन आलो आहोत.

1) दार्जिलिंग

पश्चिम बंगालचा स्वर्ग अशी दार्जिलिंग शहराची ओळख आहे. येथील निसर्गाचा आनंद हजारो पर्यटक येत असतात. खासकरून येथील चहाच्या बागा खास आकर्षण असतात. पावसाळ्यात या शहराचं सौंदर्य आणखीन खुलतं. अशात या ठिकाणी पार्टनरसोबत वेळ घालवणं तुम्हाला नेहमीसाठी स्मरणात राहणार.

2) गंगटोक

सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये पावसाळ्यात स्वर्गाचा आनंद मिळतो. इतर ऋतूंमध्ये तर इथे पर्यटकांची गर्दी असतेच. सोबतच पावसाळ्यात येथील वातावरण अधिक रोमॅंटिक असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इथे पावसाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. 

3) केरळ

केरळ हे नदी आणि डोंगर-दऱ्यांनी वेढलेलं एक खास ठिकाण आहे. केरळच्या नैसर्गिक सुंदरतेत तुम्ही इतके हरवाल की, चिंतामुक्त व्हाल. केरळमध्ये पावसाळा ड्रिम सीझन म्हणूनही ओळखला जातो. वेगळ्या खाण्याची मजा आणि फिरण्याची मजा जी इथे येईल कुठेच नाही. त्यामुळे या दिवसात इथे जास्त प्रमाणात पर्यटक येतात. तुम्हीही हा पावसाळा अधिक रोमॅंटिक आणि यादगार करण्यासाठी इथे जाऊ शकता.

4) मेघालय

पावसाची खरी मजा घ्यायची असेल तर तुम्ही या मेघालयात फिरायला जाऊ शकता. इथे बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. मेघालयाला ढगांचं घर असंही म्हटलं जातं. कारण इथे जवळपास वर्षभर पाऊस होत असतो. पण तरीही पावसाळ्यात येथील नजारा काही वेगळाच असतो. पावसांच्या सरींमध्ये येथील निसर्ग आणखीन सुंदर होतो.

5) अंदमान-निकोबार

अंदमान-निकोबार हे बेट आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी फारच नावाजलेलं आहे. त्यामुळे अनेक हनीमूनसाठीही इथेच जातात. हे ठिकाण फारच रोमॅंटिक मानलं जातं. खासकरून पावसाळ्यात येथील वातावरण फारच मनमोहक असतं. पाऊस, समुद्रातून उसळणाऱ्या लाटा अशात तुम्हाला पार्टनरची साथ. या रोमॅंटिक ठिकाणाची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या बीचवर बसून तुम्ही निळं चमकतं पाणी आणि आभाळ एकत्र येताना बघू शकता.

Web Title: Monsoon Special : Destination list for a perfect romantic vacation in Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.