पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील 5 बेस्ट ठिकाणं, यादगार होईल प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:55 AM2023-06-27T10:55:14+5:302023-06-27T10:59:28+5:30
Monsoon Travel Tips : पावसाळ्यात या ठिकाणांवर फिरायला जाऊन तुम्ही पावसाचा आणखी जास्त आनंद घेऊ शकाल.
Monsoon Travel Tips : पावसाळ्यात फिरण्याची मजाच काही वेगळी असते. संततधार पाऊस, हिरवीगार निसर्ग मनाला फार आनंद देऊन जातो. म्हणूनच तर पावसाळा सुरू झाला की, भटकंती करणारे लोक वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. अशाच लोकांसाठी आम्ही काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. ही राज्याबाहेरची खास ठिकाणं पावसाळ्यात फिरण्यासाठी फार प्रसिद्ध आहेत.
1) मुन्नार
केरळमधील पावसाळा किती सुंदर आणि आकर्षक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. केरळमधील मुन्नारला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याची वाट पाहतात. कारण पावसाळ्यात इथे येऊन तुम्ही तुमच्या तणावापासून मुक्त व्हाल.
2) देवरिया ताल
उत्तराखंडमधील मस्तुरा आणि सारी गावांजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथून दिसणारा नजारा बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी असते. या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवी.
3) कोडायकनाल
तामिळनाडूमधील दिनदीगुल डोंगरांच्या मधोमध कोडायकनाल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे चारही बाजूंनी केवळ हिरवळ बघायला मिळते. पावसाळ्यात तर या ठिकाणी फारच सुंदर नजारा असतो. जर तुम्हाला अशा ठिकाणाचा शोध असेल तर इथे नक्कीच जाऊ शकता.
4) बिष्णुपूर
पश्चिम बंगालच्या बंकुरा जिल्ह्यात हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नजारा मनमोहक असतो. येथील मंदिरे आणि डोंगर तुम्हाला कधीही न अनुभवलेला अनूभव देतील.
5) जीरो
अरुणाचल प्रदेशातील जीरो या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर गावांमध्येही या गावाचा समावेश आहे. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला कोणताच ऋतू असू शकत नाही.