मेट्रो कापणार मुंबईकरांचा खिसा

By admin | Published: August 8, 2015 12:23 AM2015-08-08T00:23:52+5:302015-08-08T00:23:52+5:30

मेट्रो कापणार मुंबईकरांचा खिसा

Mumbai's pocket in the Metro | मेट्रो कापणार मुंबईकरांचा खिसा

मेट्रो कापणार मुंबईकरांचा खिसा

Next
ट्रो कापणार मुंबईकरांचा खिसा
दरवाढीला सवार्ेच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील
मुंबई - मंुंबई मेट्रोच्या नविन तिकिट दरवाढीला शुक्रवारी सवार्ेच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे रिलायन्सची मुंबई मेट्रो मुंबईकरांचा खिसा कापणार हे निश्चित झाले. न्यायालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्यामुळे कमीत कमी १0 रुपये तर जास्तीत जास्त ११0 रुपये भाडे होणार आहे. नविन भाड्याची अंमलबजावणी ही ऑक्टोबरनंतरच लागू होईल, अशी माहीती मेट्रोकडून देण्यात आली.
नविन भाडेवाढीचा वाद हा जानेवारी २0१५ मध्ये सवार्ेच्च न्यायालयात गेला होता. यात न्यायालयाने दर निश्चिती समिती स्थापन करण्यास सांगितले. त्यानुसार तीन सदस्यांची दरनिश्चिती समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडून कमीत कमी १0 तर जास्तीत जास्त ११0 रुपये भाडेवाढीची शिफारस करण्यात आली होती. समितीकडून नवीन भाड्याचा अहवाल न्यायालयाकडेही सादर करण्यात आला होता. यावर न्यायालयाकडून शुक्रवारी निर्णय देत नविन भाडेवाढीला मंजुरी दिली. त्यामुळे मेट्रोचे वसार्ेवा ते डीएननगरचे भाडे १0 रुपये, वसार्ेवा ते एअरपोर्ट रोडपर्यंतचे भाडे ६0, साकिनाकापर्यंतचे ८0 तर घाटकोपरपर्यंतचे भाडे हे ११0 रुपये होईल. याबाबत मेट्रोतील सूत्रांकडून सांगण्यात आले की, सध्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत भाडेवाढ होणार नाही. त्यानंतर भाडेवाढ होईल. मात्र सरकारकडून जर तोडगा काढण्यात आला आणि अनुदान किंवा अन्य मागण्यांचा विचार केला गेला तर ठरवण्यात आलेल्या नविन भाडे कमीही होऊ शकते.
........................................
दर निश्चिती समितीने सुचविलेले नविन भाडे
स्थानक भाडे
वसार्ेवा ते डीएननगर १0
वसार्ेवा ते आझादनगर २0
वसार्ेवा ते अंधेरी ३0
वसार्ेवा ते वेर्स्टन एक्सप्रेस हायवे४0
वसार्ेवा ते चकाला ५0
वसार्ेवा ते एअरपोर्ट रोड ६0
वसार्ेवा ते मरोळ नाका ७0
वसार्ेवा ते साकिनाका ८0
वसार्ेवा ते असल्फा ९0
वसार्ेवा ते जागृती नगर १00
वसार्ेवा ते घाटकोपर ११0
..................................

सध्याचे भाडे हे कमीत कमी १0 रुपये तर जास्तीत जास्त ४0 रुपये एवढे आहे. मात्र आता तीन महिन्यानंतर होणारे भाडे हे मुंबईकरांचे खिसे कापणारे ठरणार आहे.
..................................

Web Title: Mumbai's pocket in the Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.