वाइल्डलाइफ एक्सपिरियंससाठी ओडीशातील 'या' अभयारण्यांना भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 03:09 PM2019-01-10T15:09:40+5:302019-01-10T15:13:16+5:30

अनेकदा फिरण्यासाठी आपण अनेक नवनवीन ठिकाणांची निवड करत असतो. काहींना अ‍ॅडवेंचर्स करण्याची आवड असते, काहींना समुद्र किनाऱ्यांवर फिरण्याची इच्छा असते.

Must visit odisha if you are nature and wildlife century lover | वाइल्डलाइफ एक्सपिरियंससाठी ओडीशातील 'या' अभयारण्यांना भेट द्या!

वाइल्डलाइफ एक्सपिरियंससाठी ओडीशातील 'या' अभयारण्यांना भेट द्या!

googlenewsNext

अनेकदा फिरण्यासाठी आपण अनेक नवनवीन ठिकाणांची निवड करत असतो. काहींना अ‍ॅडवेंचर्स करण्याची आवड असते, काहींना समुद्र किनाऱ्यांवर फिरण्याची इच्छा असते. तर काहींना वाइल्‍डलाइफचा अनुभव घेण्याची गरज असते. पण या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सची निवड करावी लागते. पण जर असं झालं तर, या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला एकाच ठिकाणी घेता आला तर? म्हणजेच एकाच ठिकाणी तुमची मस्ट टू विजिट ट्रॅव्हल लिस्टही पूर्ण होईल आणि तुम्हाला ट्रॅव्हल डेस्टिनेशनवर जाण्याती संधीही मिळेल. जाणून घेऊया भारतातील ओडिशामध्ये असलेल्या वाइल्डलाइफ सेंच्युरीबाबत...

डेबरीगढ वाइल्‍डलाफ सेंचुरी 

डेबरीगढमध्ये टायगर, लेपर्ड, हाइना, स्पॉटेड डियर,  तरस यांसोबत अनेक प्रवासी पक्षी पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त चार शिंगं असलेली हरणंही येथे पाहायला मिळतील. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या जंगलामध्ये ओडीशाचे प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी सुरेंद्र साई यांनी ब्रिटीश राजवटीविरोधात बंड पुकारताना यांच जंगलाचा आधार घेतला होता. येथे वर्षभर देशोविदेशीचे पर्यटक येत असतात. पण थंडीमध्ये येथे पर्यटकांची रिघ लागते. 

सुनाबेडा वाइल्‍डलाइफ सेंचुरी 

तसं पहायला गेलं तर सर्वच अभयारण्य सुंदर असतात. परंतु त्यातल्यात्यात सुनाबेडा अत्यंत सुंदर आहे. कारण येथे हिरवी शाल पांघरलेले अनेक डोंगर, दऱ्या, धबधबे आहेत. याव्यतिरिक्त येथे वाघ, स्‍लॉथ डियर, बार्किंग डियर, बिबटे यांसारखे प्राणी आहेत. तसेच गिधाडं, पहाडी मैना यांसारखे इतर पक्षी पाहायला मिळतात. तसेच येथे अनेक जंगली म्हशींच्या प्रजाती पाहता येतील. 

सतकोसिया टाइगर रिजर्व
 
सतकोसिया या अभयारण्यामध्ये तुम्हाला मगर आणि सुसर यांव्यतिरिक्त इतर स्तनधारी प्राण्यांच्या 38 प्रजाती पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त हत्ती, बिबट्या, जंगली कुत्रे आणि वाघांच्या अनेक प्रजाती येथे तुम्हाला पाहायला मिळतील. येथे नदीच्या किनाऱ्यावर बसून पक्षी आणि स्तनधारी प्राण्यांच्या वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी पाहायला मिळतील. 

हैदागढ वाइल्‍डलाइफ सेंचुरी 

ओडीशामधील एक आणखी सुंदर अभयारण्य म्हणजे हैदागढ हे होय. याची स्थापना 1978मध्ये करण्यात आली होती. या अभयारण्यातून जाणारी सालंदी नदी या जंगलासाठी लाइफलाइन मानली जाते. या नदीवर एक डॅम तयार करण्यात आलेला आहे. ज्याला सालंदी डॅम म्हणून ओळखलं जातं. हे एक लोकप्रिय वाइल्‍डलाइफ डेस्टिनेशन आहे. येथे थंडीमध्ये अनेक पर्यटक येत असतात. 

कोटागढ वाइल्‍डलाइफ सेंचुरी 

ओडीशामधील कंधमाल जिल्ह्यामध्ये असलेलं हे अभयारण्य पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे वैशिष्ट्य म्हणजे, हत्ती, हरणं आणि वाघ. हे अभयारण्य स्तनधारी प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून यासाठी ते घर मानलं जातं. येथे अनेक वेगवेगळे पक्षीदेखील पाहायला मिळतात. तुम्ही अजुन एखदाही येथे गेला नसाल तर अवश्य भेट द्या. 

गहीरमथा मरीन सेंचुरी 

ओडीशामधील एकमेव कासवांचं अभयारण्य म्हणून गहीरमथा ओळखलं जातं. दरवर्षी येथे लाखो ऑलिव्ह रिडले टर्टल हिंदी महासागर, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर पार करू येथे येतात आणि समूहामध्ये एकत्र अंडी देतात. येथे कासवांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळतात. कासवांना संरक्षण देण्यासाठी आणि दुर्मिळ प्रजातींच्या रक्षणासाठी ओडिशा सरकारने 1979मध्ये या जागेला कासवांचं अभयारण्य घोषित करण्यात आलं आहे. 

Web Title: Must visit odisha if you are nature and wildlife century lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.