हिवाळ्यात 'तेनी' या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या...... आणि गुलाबी थंडीचा आनंद लुटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 06:05 PM2019-12-04T18:05:21+5:302019-12-04T18:14:15+5:30

हिवाळ्यात प्रत्येकालाच  थंडीचा आनंद  घ्यायचा असतो.

Must visit tourist place in winter . | हिवाळ्यात 'तेनी' या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या...... आणि गुलाबी थंडीचा आनंद लुटा 

हिवाळ्यात 'तेनी' या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या...... आणि गुलाबी थंडीचा आनंद लुटा 

Next

हिवाळ्यात प्रत्येकालाच थंडीचा आनंद  घ्यायचा असतो. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी कुठे जाता येईल का याचा विचार सध्या सगळ्यांच्या डोक्यात चालला आहे. कारण डिसेंबर महिना सुरू झाला आहे. या वातावरणात गुलाबी थंडिचा आनंद घ्यायचा असेल तर  आपल्या प्रिय लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी आजच तयारील लागा. आज तुम्हाला भारतातील काही अशा काही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला थंडीचा मनसोक्त आनंद घेता येईल

(Image credit- holidify.com)

तेनी हे  भारतातील सगळ्यात सुंदर आणि फार कमी लोकांना माहित असलेले तामीळनाडू राज्यातील एक ठिकाण आहे. जिथं  पाऊल ठेवल्यानंतर नीलगीरी पर्वताची उंची  सुध्दा कमी झाल्यासारख वाटतं. या ठिकाणच्या नागमोडी अरुंद रस्यावरून चालत असताना सगळ्याच पर्यटकांना निर्सगाची नव्याने ओळख होते. या निमुळत्या रस्त्यांच्या आजुबाजूला मोकळ्या जागेत शेतं आहेत. ती लांब लांब पर्यत पसरलेली आहेत. त्याच भागात असणाऱ्या मैदानी परिसरात गेल्यानंतर आंब्याच्या बागा दिसायला सुरूवात होते. त्याच रस्त्याच्या खालच्या बाजूने गेल्यास नारळाच्या झाडांनी तसेल केळ्याच्या बागांमधून वावारत असताना मन अगदी प्रसन्न होते.

नीलगिरी पर्वतांच्या रांगामध्ये असणारी हिरवळ अल्हाददायक आहे. तामिळनाडू राज्याच्या सौदर्यांत भर घालण्यात तेनी या पर्यटन स्थळाचा मोठा वाटा आहे. तसेच देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून या स्थळी निसर्गसृष्टीचा आनंद घेण्यासाठी लोक येत असतात. सगळ्या प्रकारचं समाधान पर्यटकांना या जागी मिळतं. जसं की ज्या व्यक्तीला ट्रेकिंगची आवड आहे. त्यांना नीलगीरीच्या पर्वत रांगामध्ये मनसोक्त आनंद लुटता येतो. पुजा अर्चा करणाऱ्या लोकांसाठी इथे अनेक  धार्मीक स्थळं उभारण्यात आली आहेत.

या ठिकाणी लहान मोठी अशी  २७ जंगलं आहेत. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ज्या लोकांना शांतता हवी असते. त्या लोकांसाठी हे स्थळ म्हणजे जणू काही स्वर्गच. याठिकाणी जैविक चहाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक नद्या आहेत. निसर्ग सौदर्यांने नटलेले तेनी हे पर्यटन स्थळ भारतातील नयनरम्य स्थळांपैकी एक  आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे, तसेच विमानसेवा देखील उपलब्ध आहेत. बोंडी आणि मदुरै या रेल्वे स्थानकांच्या मध्ये तेनी हे स्थानक  आहे. तसेज अंतर्गत वाहतुकीसाठी खासगी  बस देखील उपलब्ध आहेत. तर या हिवाळ्यात या निसर्गाच्या खुशीत वसलेल्या  या पर्यटन स्थळाला  नक्की भेट द्या.

Web Title: Must visit tourist place in winter .

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.