दिवा - कोपर मार्गावर रेल्वे अपघातात मायलेकींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 05:23 PM2018-02-10T17:23:55+5:302018-02-10T17:28:38+5:30
रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
डोंबिवली: रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शामबाबी मोहम्मद दरवेझ(७३) रा. दर्गा रोड, शिवाजी नगर, मुंब्रा, आणि तस्लीमा बेलकर (२२) रा. रहेजा गार्डन, दर्गा रोड, मुंब्रा या मायलेकींचा मृत्यू झाला. त्या दोघीही एका लग्नासाठी दिवा स्थानकात उतरुन त्यानंतर रेल्वे रुळ ओलांडून फलाट १ लगतच्या ट्रॅकवरुन जात असतांना कसारा-२ या डाऊन मार्गावरील लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी मयतांच्या वारशांचा शोध घेत, त्यांना माहिती दिली. त्यानूसार मयत शामबाबी यांच्या मुलाने ओळख पटवत मृतदेह ताब्यात घेतला. यासंदर्भात पुढील तपास डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहपोलिस निरिक्षक हिंदूराव जगताप ह ेकरत आहेत. रेल्वे रुळ ओलांडणे जिवाला धोका आहे असे सातत्याने रेल्वे प्रशासन उद्घोषणा यंत्राद्वारे सूचित करत असते, पण त्याकडे कानाडोळा केला जातो, आणि दिवसाला सरासरी १० प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. तरी प्रवाशांनी रुळ ओलांडू नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले.
==============