'या' गावात महिला पुरूषांसोबत न राहता एकट्याच राहतात, कारण वाचून व्हाल अवाक्....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 03:25 PM2020-03-08T15:25:35+5:302020-03-08T15:36:59+5:30

या ठिकाणचे सगळेच धोरणात्मक निर्णय महिलांनी घेतलेले असतात. या गावात पुरूषांना प्रवेश बंदी आहे

No entry of men in umoja village of kenya women said can not imagine living with men MYB | 'या' गावात महिला पुरूषांसोबत न राहता एकट्याच राहतात, कारण वाचून व्हाल अवाक्....

'या' गावात महिला पुरूषांसोबत न राहता एकट्याच राहतात, कारण वाचून व्हाल अवाक्....

Next

(image credit- point blank7)

वर्ल्ड इकोनॉमिक्स फोरामच्या रिपोर्टनुसार मागिल ५० वर्षापासून ८५ टक्के राज्य अशी आहेत. ज्या ठिकाणच्या प्रमुख या महिला आहेत. या  राज्यांचं प्रतिनिधीत्व महिला करत आहेत. उत्तर केनियामध्ये एक उमोजा नावाचे गाव आहे.   हे गाव आज सुद्धा अनेकांच्या चर्चेचं विषय ठरत आहे. या ठिकाणचे सगळेच धोरणात्मक निर्णय महिलांनी घेतलेले असतात. या गावात पुरूषांना प्रवेश बंदी आहे. २०१५ मध्ये या गावातील महिलांची संख्या  ४७ इतकी होती. 

(Image credit- The guardian)

कसं बनलं हे महिलाप्रधान गाव

याची सुरूवात  गंभीर स्वरूपाच्या अत्याचाराचा  सामना करत असलेल्या महिलांनी केली. १९९० मध्ये याची सुरूवात  करण्यात आली. त्याआधी महिलांना बालविवाह, घरगुती हिंसा यांचा सामना करावा लागत होता. मग एकट्या राहून महिला स्वतःचं खाणं, कपडे आणि घरदार याची व्यवस्था सुद्धा महिला पहायला लागल्या. याशिवाय अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. त्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो. 

(image credit- around the globe)

हे गाव निर्माण केलेल्या रेबेका लोलोसोली  या महिलेला काही पुरूषांनी मारहाण केली होती.  रेबेकाला ही शिक्षा महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिल्यामुळे झाली होती. रूग्णालयात  उपचार चालू असताना अशा गावाची संकल्पना या महिलेच्या डोक्यात आली. ज्या गावात फक्त महिला असतील. २०१५ मध्ये या गावाची एकूण लोकसंख्या  ४७ महिला आणि २०० मुलं इतकी होती.  माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार  रेबेकाला स्थानिक लोकांकडून धमक्या सुद्धा मिळत होत्या.

(image credit-the ahimasa project)

उमोजा या गावातील महिला पुरूषांशिवाय एकट्या राहतात. त्यांना पुरूषांसोबत राहण्याची जराही इच्छा नाही. पतिच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून एक महिला पळून उमोजा या गावात राहण्यासाठी आली.  ती असं म्हणणं आहे की तिला फक्त मुलांचा सांभाळ करायचा आहे. पुन्हा लग्न करण्यात तिला काहीही रस नाही. ( हे पण वाचा-भारतातील निसर्ग सौंदर्याने नटलेली काही ठिकाणं, पर्यटकांना नक्कीच खुणावतील!)

(image credit- the Telgu bulletin)

त्या गावातील एका ३४ वर्षीय महिलेने सांगितले की तिला १६ वर्षाची असताना ८० वर्षाच्या एका माणसाच्या हवाली करण्यात आलं होतं. आता या महिलेला उमोजा या  गावातच राहायचं आहे.  पुन्हा एकदा लग्न करून पुरूषांसोबत राहण्याची कल्पना सुद्धा या महिलांना करवत नाही. अर्थात या गावातील सगळ्या महिला या पुरूषांच्या त्रासाला कंटाळून या गावाला स्वतःचं आयुष्य मोकळेपणाने जगण्यासाठी राहत आहेत. ( हे पण वाचा-जागतिक महिला दिन : ९ वर्षाच्या चिमुकलीचा प्रताप, बनवलं सोशल मीडियातील त्रासापासून सुटका करणारं अॅप)

Web Title: No entry of men in umoja village of kenya women said can not imagine living with men MYB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.