फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत जगभरातील 'ही' 5 ठिकाणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 03:03 PM2018-11-12T15:03:04+5:302018-11-12T15:04:31+5:30
अनेक लोकांना फिरण्याचा शौक असतो. तर अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तेथील निसर्गसौंदर्य, वेगवेगळे डेस्टिनेशन्स कॅमेरामध्ये कैद करण्याची आवड असते.
अनेक लोकांना फिरण्याचा शौक असतो. तर अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तेथील निसर्गसौंदर्य, वेगवेगळे डेस्टिनेशन्स कॅमेरामध्ये कैद करण्याची आवड असते. जगभरामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचसोबत तेथील हटके वास्तू, विलोभनिय निसर्गसौंदर्य नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. जाणून घेऊयात अशा काही ठिकाणांबाबत...
1. यूरोप, आइसलँड
आइसलँड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच येथील अद्भुत ठिकाणांसाठीही ओळखलं जातं. येथील स्वच्छ आणि जुनी शहर रचना नेहमीच पर्यटक आणि फोटोग्राफर्सना आकर्षित करत असते. रात्रीच्या चमकणाऱ्या निरभ्र आकाशात येथील सौंदर्य आणखी द्विगुणित होतं.
2. कम्बोडिया, सिएम रीप
अंगकोर वाट म्हणजेच सिएम रीप जगातील सर्वात मोठं धार्मिक स्थळ आहे. हे भव्य मंदिर 12व्या शतकात स्थापन करण्यात आले. या प्राचीन मंदिराला पाहण्यासाठी देशीविदेशी पर्यंटक येथे येत असतात.
3. मध्य अमेरिका, कोस्टा-रिका
कोस्टा रिकामध्ये तुम्ही कॅरेबियाईच्या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. येथील ज्वालामुखी, जंगल सफारी, बोटेनिकल गार्डन्स, नद्या, दऱ्या, पॅसिफिक आणि कॅरेथियाई समुद्र किनारी तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
4. उत्तर प्रदेश, वाराणसी
फक्त विदेशातीलच नव्हे तर भारतातील वाराणसी शहरही फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. या प्राचीन शहराला पाहण्यासाठी देशातील लोकांसह अनेक विदेशी पर्यंटकही भेट देत असतात. येथे अनेक धार्मिक वास्तूंसोबतच, रामनगरचा किल्ला, गंगा आरती यांसारखी इतरही अनेक वास्तू आहेत.
5. आसाम, काजीरंगा नॅशनल पार्क
आसाममध्ये असलेलं काजीरंगा नॅशनल पार्क संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल आणि तुम्हाला वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करण्याची इच्छआ असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.