OMG : ​...तर हे आहे ‘अमर ज्योत’ धबधब्याचे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 07:53 AM2017-04-28T07:53:12+5:302017-04-28T13:23:12+5:30

याठिकाणी एक ज्योत नेहमी तेवत राहते. पाण्याच्या मध्ये ज्योत हेच येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. ही ज्योत अक्षय असल्याचे सांगितले जाते मात्र ते खरे नाही.

OMG: ... then this is the 'Amar Jyot' waterfall secrets! | OMG : ​...तर हे आहे ‘अमर ज्योत’ धबधब्याचे रहस्य !

OMG : ​...तर हे आहे ‘अमर ज्योत’ धबधब्याचे रहस्य !

Next
यूयॉर्कमधील चेस्टनट रिजनल पार्क मध्ये एक लहानसा धबधबा असून त्याला अमर ज्योत धबधबा किंवा इटरनल फ्लेम फॉल असेही म्हणतात. असे म्हणण्याचे कारण म्हणजे याठिकाणी एक ज्योत नेहमी तेवत राहते. पाण्याच्या मध्ये ज्योत हेच येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. ही ज्योत अक्षय असल्याचे सांगितले जाते मात्र ते खरे नाही. कधीकधी ही ज्योत विझते पण त्याचवेळी तेथे गेलेले कोणी हायकर, ट्रेकर ती पुन्हा प्रज्वलित करतात. 
१२१३ एकर परिसरात असलेले हे उद्यान हायकिग ट्रेलस, सायकलींग ट्रॅक, मैदाने, टेनिस कोर्ट, पर्यटकांसाठी विविध सुविधांनी युक्त असलेले हे स्थळ प्रामुख्याने उन्हाळी पर्यटन स्थळ आहे. मात्र ज्या कारणाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे त्या इटरनल फ्लेम धबधब्यापाशी पर्यटकांची फारशी गर्दी नसते. येथे जाताच कुजक्या अंड्यासारखा वास येऊ लागतो. हा वास धबधब्याच्या खडकांखाली असलेला व लीक होत असलेल्या नैसर्गिक गॅसचा आहे. या धबधब्यात एक गुहेसारखा भाग असून याच्या आत गॅस लिक होतो तेथेच ही फ्लेम पेटते. गुहेप्रमाणे कपार असल्याने या ज्योतीला आपोआपच पाणी व वाºयापासून संरक्षण मिळते. 
उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने हा धबधबा वाहू लागतो. कधीकधी खूप पाऊस झाल्याने त्याची उंची ३० फुटांपर्यंतही वाढते. पाच फुट उंचीच्या मधल्या गुहेत ही ज्योत गॅस किती लिक होतो त्यानुसार लहान मोठी होते. कधीकधी ती चार ते ८ इंचांपर्यंतही दिसते. पाण्याचा वेग फार वाढला तर ही ज्योत कधीकधी विझते. पृथ्वीवर या प्रकारचा हा एकमेव धबधबा असल्याचे सांगितले जाते. 

Web Title: OMG: ... then this is the 'Amar Jyot' waterfall secrets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.