केवळ 'या' नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळतात एक शिंग असलेले गेंडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 12:28 PM2019-01-12T12:28:29+5:302019-01-12T12:31:04+5:30

हे ठिकाण केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. या वेगळेपणामुळे यूनेस्कोने हे ठिकाण १९०५ मध्ये वर्ल्ड हेरिटेजमध्ये सामिल केलं होतं. 

One horn rhinos in Kajiranga national park- | केवळ 'या' नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळतात एक शिंग असलेले गेंडे!

केवळ 'या' नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळतात एक शिंग असलेले गेंडे!

Next

आसाममध्ये असलेले काजीरंगा नॅशनल पार्कची खासियत म्हणजे इथे एक शिंग असलेले गेंडे बघायला मिळतात. तुम्हाला वाइल्डलाइफची आवड असेल, जंगलात फिरण्याची आवड असेल तर तुम्ही इथे भेट देऊ शकता. या नॅशनल पार्कमध्ये हे एका शिंगाचे गेंडे फार सहजपणे बघायला मिळतात. त्यामुळे हे ठिकाण केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. या वेगळेपणामुळे यूनेस्कोने हे ठिकाण १९०५ मध्ये वर्ल्ड हेरिटेजमध्ये सामिल केलं होतं. 

काजीरंगा नॅशनल पार्क

उंचच उंच गवत, दलदल असलेलेा परिसर आणि दाट जंगल असलेलं हे नॅशनल पार्क ४३० स्क्वेअर किमी परिसरात पसरलेलं आहे. इथे साधारण २२०० गेंडे आहेत. गोलाघाट आणि नागोन जिल्ह्यात हा नॅशनल पार्क आहे. एका शिंगाच्या गेंड्याऐवजी इथे तुम्ही हत्ती, जंगली म्हशी आणि हरीणांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघू शकता. काही वर्षांपूर्वी या पार्कमध्ये वाघांची संख्याही फार वाढली होती. २००६ मध्ये या पार्कला टायगर रिझर्व्ह दर्जा देण्यात आला होती. या नॅशनल पार्कमध्ये हॉर्नबिल, आयबिस, ब्लॅक नेक स्टॉर्क, रिंगटेल फिशिंग इगल आणि हुलॉक गिब्बनसारखे आणखीही काही वेगळे पक्षी बघायला मिळतात. 

गेंड्यांचे प्रकार

जगभरात पाच प्रकारचे गेंडे आढळतात, पांढरे, काळे, इंडियन, जावन आणि सुमात्रन. पांढऱ्या आणि काळ्या गेंड्यांची प्रजाती आफ्रिकेत आढळते. इंडियन, जावन आणि सुमात्रन या आशियाई प्रजाती उत्तर पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि बांग्लादेशात आढळतात. गेंड्यांच सरासरी वजन २ हजार किलोग्रॅम असतं. आफ्रिकेतील गेंड्यांना वेगळं ठरवतं ते त्यांचं एक शिंग. त्यांना केवळ एकच शिंग असतं. त्यासोबतच त्यांच्या त्वचेवर वेगवेगळ्या घड्याही असतात. 

कधी जाल?

दरवर्षी १ मे ते ३० ऑक्टोबरपर्यंत काजीरंगा नॅशनल पार्क पर्यटकांसाठी बंद ठेवलं जातं. त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान तुम्ही इथे येण्याचं प्लॅनिंग करु शकता. 

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - जोरहाट येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. हे काजीरंगापासून ९७ किमी अंतरावर आहे. त्यासोबतच गुवाहाटी एअरपोर्टचाही पर्याय आहे. हे काजीरंगापासून २१७ किमी अंतरावर आहे. इथून कॅबने काजीरंगाला पोहोचता येतं. 

रेल्वे मार्ग - रेल्वे मार्गाने इथे पोहोचणे सर्वात सोपे आहे. कारण इथपर्यत पोहोचण्यासाठी रेल्वेचे अनेक पर्याय आहेत. गुवाहाटी येथील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. 

रस्ते मार्गे - रोडने इथे पोहोचण्यासाठी आधी गुवाहाटी किंवा जोरहाटला पोहोचावं लागेल. तेथून बस किंवा टॅक्सी उपलब्ध होतील.
 

Web Title: One horn rhinos in Kajiranga national park-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.