सुट्टी फुल टू एन्जाय करण्यासाठी मालदीवला नक्की भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 06:23 PM2018-08-28T18:23:39+5:302018-08-28T18:24:06+5:30
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. चारही बाजूला पसरलेला निळाशार समुद्र आणि सोनेरी रंगाच्या वाळूवर सन बाथ घेणं असो किंवा बोटींग करणं. याचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही परिणीतीप्रमाणे मालदिवला भेट नक्की द्या.
मालदीवच्या आकाश पांघरलेल्या समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी, स्कूबा डायविंग, वॉटर स्कीइंगसोबत अनेक प्रकारच्या बॉटर अॅडवेचर्ससाठी फेमस आहेत. यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे मालदीव फिरण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रमैत्रीणींसोबत किंवा एकट्याने प्रवास करू शकता.
1. स्कूबा डायविंगसाठी उत्तम डेस्टिनेशन
36 मूंगा प्रवालद्वीप आणि 1992 छोट्या आयर्लंडने मिळून मालदीव बेट तयार झालं आहे. स्कूबा डायविंगसाठी उत्तम डेस्टिनेशन म्हणून मालदीव ओळखलं जातं. मालदीवमध्ये प्रत्येक रिसॉर्टशेजारी स्कूबा डायविंगची सोय करण्यात आली आहे. जर तुम्हालादेखील पाण्याच्या आतम असलेलं जीवन जगण्याची इच्छा असेल तर स्कूबा डयविंग करू शकतो. स्कूबा शिकणाऱ्यांसाठी इथे डायविंग स्कूल आणि कोर्सही आहेत. जे तुम्हाला स्कूबासाठी पूर्णतः ट्रेनिंग देतात आणि त्यानंतरच स्कूबा डायविंगसाठी घेऊन जातात.
2. फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी स्वर्ग
ज्या लोकांना फोटोग्राफी करण्यात इंटरेस्ट आहे, ते लोकं मालदीवमध्ये अंडरवॉटर फोटोग्राफीचा आनंद घेऊ शकतात. कोरल रीफ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या जाती आढळून येतात. या ठिकाणी पाण्यामध्ये असलेले कोरल आणि पाण्याखालील जग पाहून तुम्हीही हैराण व्हाल. जर तुमच्याकडे कॅमेरा नसेल किंवा कॅमेरा घेऊन जायला विसरल असाल तर येथे कॅमेरा तुम्ही रेन्टनेही घेऊ शकता.
3. पाण्याखालील जग अनुभवा
सिनेमांमध्ये अनेकदा पाण्याखाली चालणाऱ्या पाणबुड्या पाहिल्या असतील. त्यामध्य बसून पाण्याखालील जग अनुभवण्याची इच्छाही झाली असेल. तुमची ही इच्छा मालदिवमध्ये पूर्ण होईल. त्यामध्ये बसून तुम्हा पाण्याखालचं जर अनुभवू शकता.
4. व्हेल आणि डॉल्फिनच्या जाती
मालदिवमध्ये व्हेल आणि डॉल्फिनच्या अनेक जाती आढळून येतात. व्हेल आणि डॉल्फिन माशांना जवळून पाहायचे असेल तर मालदीव हा बेस्ट ऑप्शन आहे. येथे ब्लू व्हेलपासून स्पिनर डॉल्फिनपर्यंत अनेक मासे पाहायला मिळतील.
5. स्नोर्कलिंगसाठी उत्तम पर्याय
मालदीव स्नोर्कलिंगसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये डायविंग मास्क आणि पोहण्याचे फ्लिपर घालून पाण्यामध्ये पोहावं लागतं. त्यामध्येही तुम्ही पाण्याखालील जग अनुभवता येतं.