पाळधी जवळील दुर्घटणेने प्रवाशांचे हाल

By admin | Published: March 13, 2016 12:04 AM2016-03-13T00:04:46+5:302016-03-13T00:04:46+5:30

अपघात : युद्धस्तरावर काय सुरु

Passengers' arrival in Badrinath | पाळधी जवळील दुर्घटणेने प्रवाशांचे हाल

पाळधी जवळील दुर्घटणेने प्रवाशांचे हाल

Next
घात : युद्धस्तरावर काय सुरु
जळगाव : पश्चिम रेल्वे च्या पाळधी रेल्वे स्थानकाजवळ कोळशाने भरलेल्या मालगाडीचे तीन डबे घसरून झालेल्या अपघातामुळे जळगाव- सुरत रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी ३:१५ वाजे पासून ठप्प झाल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. या मार्गावरील अनेक गाड्यांना विलंबाने धावल्या.वहतुक सुरळीत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु करण्यात आले.
अपघातामुळे दुपारी ३ वाजेनंतर डाऊन मार्गावर धावणार्‍या उधना -दानापूर एक्सप्रेस,अजमेर -पुरी एक्सप्रेस, गांधीधाम -पुरी एक्सप्रेस, सुरत -भागलपूर ताप्तीगंगा एक्सप्रेस, अहमदाबाद -चेन्नई नवजीवन एक्सप्रेस, बिकानेर -सिकंदाराबाद एक्सप्रेस. तर अप मार्गावरील नागपूर -अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस, अलाहाबाद -अहमदाबाद एक्सप्रेस या गाड्या जवळपास आर्धा ते चार तास विलंबाने धावल्या.
गाड्या उशिरा धावत असल्याने अनेक प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. नवजीवन एक्सप्रेसने शेगाव जाणार्‍या काही भाविकांना गाडी विलंबाने धावत असल्याने जळगावहून भुसावळ व भुसावहून शेगावचा मार्ग काढावा लागला. डाऊन मार्गावर मात्र मुंबई, पुणेकडून येणार्‍या गाड्या नियमित सुरु असल्याने फारशी अडचण प्रवाशांना भासली नाही.
प्रवाशांची ताटकळले
जळगावहून सुरत,अहमदाबादकडे जाणारी प्रेरणा एक्सप्रेस गाडी अपघातामुळे भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ थांबवून ठेवल्याने या गाडीने जळगावहून प्रवास करणारे प्रवाशी गाडी नसल्याने प्रवाशी ताटकळले होते. या मार्गावर पर्यायी गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती.
सुरत पॅसेंजरची गर्दी कमी
सायंकाळी नियमित धावणारी भुसावळ -सुरत पॅसेंजर रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी गुरुवार पासून बंद असल्याने या गाडीने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी पर्यायी वाहन व गाड्यांचा वापर होत असल्याने सुद्धा प्रवाशांना फार अडचणी जाणवल्या नाही.
रिलिफ व्हॅॅन रवाना
घटनेची माहिती मिळताच भुसावळहून दुपारी ३:३५ वाजता तत्काळ रिलिफ व्हॅन रवाणा करण्यात आली होती. मात्र वाहतूकीचा अडथळा असल्याने ती पोहचण्यासही विलंब झाला. दरम्यान धरणगाव व नंदूरबार येथील रिलिफ व्हॅन घटनास्थळी पोहचून मदत कार्यात लागले होते. अपघातात जीवित हानी झाली नाही. मात्र रुळ व ओएचई केबलचे नुकसान झाले असून काम युद्धस्तरावर सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दौंड जवळ ड्रीलमेंट
मनपाड -पुणे मार्गावर दौंड जवळ मालगाडीचे डबे रुळावरुन घसरल्याने या मार्गावरही काही काळ वाहतूक ठप्प असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Passengers' arrival in Badrinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.