अजबच! 'या' मंदिरात देवाला अर्पण केली जाते बीडी, लोक म्हणतात अन्यथा कोप होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:14 PM2022-03-28T18:14:14+5:302022-03-28T18:24:34+5:30

एका मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून चक्क विडी अर्पण केली जाते. विशेष म्हणजे या गोष्टीची कोणी चेष्टा-मस्करी केली तर त्याच्या जीवनात अनिष्ट घटना घडतात, असं सांगितलं जातं.

people offer beedi in kaimur musarhawa temple | अजबच! 'या' मंदिरात देवाला अर्पण केली जाते बीडी, लोक म्हणतात अन्यथा कोप होतो

अजबच! 'या' मंदिरात देवाला अर्पण केली जाते बीडी, लोक म्हणतात अन्यथा कोप होतो

Next

आपल्या देशात मंदिरांची (Famous Temples in India) संख्या अगणित आहे. प्रत्येक देवस्थानाचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अशा ठिकाणी श्रद्धाळू भाविकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. जीवनातल्या अडचणी, त्रास दूर व्हावा, सुख-समृद्धी मिळावी यासाठी श्रद्धाळू नागरिक देवदर्शन, पूजाविधीला विशेष महत्त्व देतात. काही मंदिरांमध्ये पूजाविधी, नैवेद्याच्या अनोख्या प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. बिहारमधल्या (Bihar) कैमूर जिल्ह्यातल्या (Kaimur District) एका मंदिरात देवाला नैवेद्य म्हणून चक्क विडी अर्पण केली जाते. विशेष म्हणजे या गोष्टीची कोणी चेष्टा-मस्करी केली तर त्याच्या जीवनात अनिष्ट घटना घडतात, असं सांगितलं जातं. याविषयीची माहिती 'पल-पल इंडिया डॉट कॉम'ने दिली आहे.

देशात काही देवस्थानं जागृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत; मात्र काही मंदिरं अनोखी असतात. बिहारमधल्या कैमूर जिल्ह्यातल्या भगवानपूर ब्लॉकमध्ये १ हजार ४०० फूट उंच डोंगरावर मुसहरवा मंदिर (Musarwa Temple) वसलेलं आहे. हे देवस्थान काही खास प्रथांमुळे चर्चेत असतं. या मंदिरात उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातले नागरिक आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी येतात. भाविक आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुसहरवा बाबांना विडी अर्पण करतात आणि मग इच्छित स्थळी जातात. हा भाग नक्षलग्रस्त (Naxal affected) मानला जातो. अधौरा टेकडीवर नक्षलवाद्यांचं राज्य होतं आणि तेव्हापासून या मंदिरात विडी अर्पण करण्याची प्रथा आहे.

याबाबत मंदिराचे पुजारी गोपाळ बाबा यांनी सांगितलं, 'मुसहरवा बाबा यांच्या मंदिरात गेल्या २२ वर्षांपासून भाविक श्रद्धेनं पूजाविधी करत आहेत. या मार्गावरून जाणारा एखादा प्रवासी (Tourist) किंवा अधौरा येथे जाणाऱ्या प्रवाशांनी या मंदिरात विडी अर्पण करावी असा संकेत आहे. असे अनेक प्रवासी आहेत, की ज्यांनी बाबांविषयी असलेल्या या श्रद्धेचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांना अनिष्ट घटनांना सामोरं जावं लागलं. त्यापैकी कोणी डोंगरावरून घसरून पडलं तर कोणी जखमी झालं. तुम्हाला या डोंगरावरून सुरक्षित प्रवास करायचा असेल तर प्रवासासाठी आवश्यक सुरक्षा साहित्यासोबत विडी बंडल आणणं गरजेचं आहे. तरच तुमचा प्रवास सुरक्षितरीत्या पूर्ण होतो.'

हा डोंगर चढण्यापूर्वी आणि चढून गेल्यावर मुसहरवा बाबांना विडी अर्पण करणं आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांच्या मार्गातले सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि प्रवास सुरक्षितपणे पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीकडे बाबांना अर्पण करण्यासाठी विडी नसते, त्या व्यक्ती मुसहरवा बाबांच्या दान पेटीत विडी अर्पण करण्यासाठी पैसे टाकतात आणि पुढील प्रवास सुरू करतात. यामुळे त्यांच्या मार्गातले सर्व अडथळे, विघ्नं दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

Web Title: people offer beedi in kaimur musarhawa temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.