चिमुकल्यांसोबत पिकनिकला गेल्यावर त्यांना ठेवा स्मार्टफोनपासून दूर अन् खेळा 'हे' स्मार्ट गेम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:42 PM2022-08-03T22:42:31+5:302022-08-03T22:46:24+5:30

मुलांच्या आरोग्याचे किंवा डोळ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर रोड ट्रिप दरम्यान तुम्ही असे काही खेळ खेळू शकता, ज्यामुळे तुमचा प्रवास आनंददायी होईल आणि मुलंही मोबाईपासून दूर राहतील.

picnic games for children | चिमुकल्यांसोबत पिकनिकला गेल्यावर त्यांना ठेवा स्मार्टफोनपासून दूर अन् खेळा 'हे' स्मार्ट गेम्स

चिमुकल्यांसोबत पिकनिकला गेल्यावर त्यांना ठेवा स्मार्टफोनपासून दूर अन् खेळा 'हे' स्मार्ट गेम्स

Next

कुटुंबासह रोड ट्रिपला जाणे हा रोमांचकारी तसेच अविस्मरणीय अनुभव आहे. अनेकदा लहान मुलं रोड ट्रिपला कंटाळतात. त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी मुलं मोबाईल बघू लागतात आणि ते तासन्तास मोबाईवर गेम खेळतात किंवा त्यावर व्हिडिओ पाहतात. मुलांना क्षणात ठेवण्यासाठी पालकही त्यांना मोबाईल देतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हा मुलांसाठी चांगला टाईमपास आहे, पण त्यांच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला मुलांच्या आरोग्याचे किंवा डोळ्यांचे नुकसान टाळायचे असेल तर रोड ट्रिप दरम्यान तुम्ही असे काही खेळ खेळू शकता, ज्यामुळे तुमचा प्रवास आनंददायी होईल आणि मुलंही मोबाईपासून दूर राहतील.

मुलांच्या वयानुसार खेळ खेळा
व्हेरीवेल फॅमिलीच्या मते, लांबच्या रोड ट्रिपमध्ये मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या वयानुसार गेम खेळल्याने प्रवास सुलभ होण्यास मदत होईल. खेळ असे असावेत की संपूर्ण कुटुंब एकत्र खेळू शकेल. ज्या मुलांना ट्रिपमध्ये अस्वस्थ वाटत असेल किंवा उलट्या होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी खेळ विशेषतः उपयुक्त ठरू शकतात.

फ्लिप फोनिक्स गेम
बहुतेक मुलांना स्वयंपाकाची आवड असते. अशा परिस्थितीत फोनिक्स साउंड शिकवण्यासाठी फ्लिप फोनिक्स गेम उपयुक्त ठरतो. त्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या आकारांची कार्ड असतात आणि त्यावर पाठीमागून अक्षरे लिहिली असतात. जेव्हा मुलं स्वयंपाक करताना ते कार्ड पलटवतात तेव्हा त्यांना त्यावर लिहिलेली वर्णमालादेखील वाचायला सांगावे. अशा प्रकारे मुलं रोड ट्रिपमध्ये गेम खेळतात आणि वर्णमालादेखील शिकतात.

वर्ड फोनिक्स गेम
जर मुल मोठे असेल आणि त्याला अक्षरं व्यवस्थित वाचता येत असतील तर रोड ट्रिप दरम्यान वर्ड फोनिक्स गेम खेळता येईल. त्यात तीन अक्षरांची स्लिप तयार करा. आता मुलाबरोबर स्टोन, पेपर, सीझर खेळा. जो जिंकेल तो स्लिप उचलेल आणि येथे लिहिलेली अक्षरे जोडून शब्द तयार करेल.

काठी खेळ
रोड ट्रिप दरम्यान, आपण मुलांना फोनिक्स शिकवण्यासाठी आईस्क्रीमच्या काड्यांचा वापर करू शकता. आईस्क्रीम स्टिकवर इंग्रजीतील सर्व 26 अक्षरे लिहा. मुलाला काठी उचलण्यास सांगा. मूल येईल त्या काठीवर लिहिलेली अल्फाबेट सांगेल आणि त्यापासून तयार झालेले तीन शब्दही सांगेल.

न्यूजपेपर हंट गेम
मुलांना हंटिंगचे गेम आवडतात. संपूर्ण कुटुंब हा खेळ खेळू शकतो. त्यात एक वर्तमानपत्र घ्या आणि एक अक्षर म्हणा. प्रत्येकाला त्या अक्षराशी संबंधित शब्द शोधायला सांगा. ज्याला सर्वात कमी वेळेत सर्वात जास्त शब्द सापडतील तो विजेता असेल. हा एक अतिशय मजेदार खेळ आहे आणि बराच काळ मुलं हा खेळ खेळू शकतात.

Web Title: picnic games for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.