'या' ठिकाणी होणार कुंभ मेळा; जाणून घ्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:23 PM2019-01-08T14:23:23+5:302019-01-08T14:24:12+5:30

उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कुंभमेळ्याची सुरूवात 15 जानेवारीला मकर संक्रातीच्या शाही स्नानानंतर होणार आहे.

Places where kumbh mela celebrated and its religious importance | 'या' ठिकाणी होणार कुंभ मेळा; जाणून घ्या खास गोष्टी

'या' ठिकाणी होणार कुंभ मेळा; जाणून घ्या खास गोष्टी

Next

उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कुंभमेळ्याची सुरूवात 15 जानेवारीला मकर संक्रातीच्या शाही स्नानानंतर होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांनुसार, कुंभ मेळ्याचा योग 4 फेब्रुवारीपासून होणार आहे. पहिलं शाही स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागराजमध्ये होणार आहे. कुंभमेळाव्याला फक्त भारतीय संस्कृतीमध्येच विशेष महत्त्व नसून यूनेस्कोने देखील 2017मध्ये कुंभ मेळ्याचा 'ग्लोबल इनटॅजिबल कल्चर हेरिटेज लिस्ट'मध्ये समावेश केला आहे. यामुळे एकदा तरी कुंभमेळ्याला भेट देणं आवश्यक आहे. 

कुंभ मेळ्याबाबत थोडक्यात 

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

कुठे-कुठे लागतो कुंभ मेळा

कुंभ मेळ्याचे आयोजन भारतामध्ये मुख्यतः चार शहरांमध्ये करण्यात येतं. यामध्ये हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिक शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये एक-एक करून अर्ध कुंभाचे आयोजन करण्यात येते. उदाहणार्थ, प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्याच्या आयोजनानंतर साधारणतः 3 वर्षांनी हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार. त्यानंतर पुढच्या तीन वर्षात त्याच्या पुढच्या ठिकाणी करण्यात येणार. अशाप्रकारे तीन वर्षांनंतर कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

काय आहे कुंभ मेळ्याचे पौराणिक महत्त्व?

कुंभ मेळ्याबाबत धार्मिक आस्था अशी आहे की, समुद्र मंथन दरम्यान जेव्हा समुद्रामधून अमृत कलश काढण्यात आला, त्यावेळी देवांमध्ये आणि दानवांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. यावेळी ज्या ठिकाणांवर अमृत सांडलं त्या ठिकाणांवर कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Web Title: Places where kumbh mela celebrated and its religious importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.