भारतातील असं ऑफबीट ठिकाण जिथे घेऊ शकता पैसा वसूल ट्रिपचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:17 PM2019-10-12T17:17:16+5:302019-10-12T17:23:01+5:30

लोकप्रिय ठिकाणांवर तर अनेकजण फिरायला जातातच. पण देशात अशीही अनेक ऑफबीट ठिकाणे आहेत जिथे तुम्ही एकदा आवर्जून भेट द्यावी.

Plan a trip to Pabbar valley Himachal Pradesh for amazing experience | भारतातील असं ऑफबीट ठिकाण जिथे घेऊ शकता पैसा वसूल ट्रिपचा आनंद!

भारतातील असं ऑफबीट ठिकाण जिथे घेऊ शकता पैसा वसूल ट्रिपचा आनंद!

Next

लोकप्रिय ठिकाणांवर तर अनेकजण फिरायला जातातच. पण देशात अशीही अनेक ऑफबीट ठिकाणे आहेत जिथे तुम्ही एकदा आवर्जून भेट द्यावी. फिरण्याची आवड असणारे लोक नेहमीच वेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. अनेकांना शांत, धावपळीच्या जगापासून दूर आणि सुंदर ठिकाणांवर जायची इच्छा असते. तुम्हीही असेल फिरण्याचे शौकीन असाल तर आम्ही तुम्हाला एका ऑफबीट ठिकाणाबाबत सांगणार आहोत. इथे भेट देऊन तुम्हाला अजिबात पश्चाताप होणार नाही.

(Image Credit : Social Media)

पाब्बर नदीचा घाट तिबेट रोडवर थेगजवळ आहे. आणि शिमलापासून १३१ किलोमीटर याचं मुख्य शहर आहे. हे ठिकाण प्रेक्षणीय स्थळांसाठी आणि ट्रेकिंगसाठी बेस्ट मानलं जातं. येथून ३१ किलोमीटर अंतरावर जुब्बल हे ठिकाण सुद्धा तेथील महालांसाठी लोकप्रिय आहे. येथून ११ किलोमीटरवर असलेलं शास्त्रीय मंदिर आकर्षणाचं केंद्र आहे.

(Image Credit : Social Media)

पाब्बर नदी शिमलापासून पुढे हिमाचल प्रदेशात आहे. घनदाट जंगल आणि देवदारच्या उंचच झाडांच्या मधून ही नदी जाते. पाब्बर घाटाचा हायवे NH२२ थियोगपासून सुरू होतो आणि पाब्बर घाट व त्यापुढेही जातो. पर्वतरांगांखाली वसलेला हा पाब्बर घाट पर्यटकांसाठी फारच रोमांचक असं ठिकाण आहे.

(Image Credit : Social Media)

पाब्बर घाटात उंच डोंगर, खळखळणारे झरे, तवाल, हिरवीगार झाडे असं नैसर्गिक सौंदर्य बघायला मिळतं. ट्रेकिंग करण्याची आवड असणाऱ्यांसाठी तर हा परिसर जणू स्वर्गच आहे. 

(Image Credit : Social Media)

येथील हाटकोटी आणि रोहरू ही ठिकाणे ट्राउट मासे पकडण्यासाठी चांगलेच लोकप्रिय आहेत. हाटकोटीमध्ये रंगांच्या शेतीसोबतच दुर्गा देवीचं मंदिरही आहे. या ठिकाणाला भेट देऊन नक्की तुम्हाला एका पैसा वसूल ट्रिपचा अनुभव येईल.


Web Title: Plan a trip to Pabbar valley Himachal Pradesh for amazing experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.