ऑगस्टमध्ये लॉन्ग विकेंड एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट आहेत 'ही' ठिकाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 12:05 PM2019-08-01T12:05:08+5:302019-08-01T12:05:29+5:30
भारतात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत.परंतु, तिथे जाण्यासाठी तुम्हाला ऋतूनुसार, तेथील वातावरणाही लक्षात घेणं गरजेचं असतं.
दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला एखाद्या ब्रेकची गरज असेल तर हॉलिडे प्लॅन करणं सर्वात उत्तम पर्याय आहे. भारतात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत.परंतु, तिथे जाण्यासाठी तुम्हाला ऋतूनुसार, तेथील वातावरणाही लक्षात घेणं गरजेचं असतं. तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास ही ट्रिप प्लॅन करू शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या या हॉलिडेसाठी काही खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत. याची निवड तुम्ही फिरायला जाण्यासाठी करू शकता.
शिमला, हिमाचल प्रदेश
पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरतं शिमला. अनेकदा येथे बर्फवृष्टीदेखील होत असते. येथील निसर्गसौदर्य पाहून तुम्ही नक्कीच प्रसन्न व्हाल. तसेच शिमल्याच्या आजूबाजूला अनेक ठिकाणं आहेत. तिथेही तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता.
जयपूर
जर तुम्ही लॉन्ग विकेंड डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर तुम्ही जयपूरलाही जाऊ शकता. राजस्थानमध्ये असलेलं हे शहर किल्ले आणि महालांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला शॉपिंगसाठीही अनेक ऑप्शन्स आहेत.
रत्नागिरी
महाराष्ट्रामध्ये असलेलं रत्नागिरी तेथील निसर्गसौंदर्य आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखलं जातं. तुम्ही विकेंड एन्जॉय करण्यासाठी हा पर्यायही निवडू शकता. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य आणखी बहरतं, तसेच येथील समुद्र किनाऱ्यांवर जाऊन तुम्ही धावपळीपासून दूर स्वतःला वेळ देऊ शकता.
पुरी
ओडिसाच्या फिरण्यासाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण जगन्नाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त बीच-लवर्ससाठी हे ठिकाण बेस्ट ठरतं. येथे तुम्हाला अत्यंत चविष्ट सी-फूड टेस्ट करायाला मिळतील.
(Image Credit : Goibibo)
लँसडाउन
तुम्ही एखाद्या छोट्या हिलस्टेशनच्या शोधात असाल तर लँसडाउन तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन ठरतो. येथे तुम्हाला अॅडव्हेचर्स आणि ट्रेकिंग करायला मिळणार नाही. पण तुम्ही येथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता.