सोलो ट्रिपसाठी प्लॅनिंग करताय? 'हे' डेस्टिनेशन ठरु शकतं बेस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:31 PM2018-11-15T12:31:05+5:302018-11-15T12:37:23+5:30
एकट्याने फिरायला जाणं तसं फार चॅलेंजींंग काम आहे. पण काही लोकांना वेगळा अनुभव घेण्यासाठी सोलो ट्रिप करायची असते.
एकट्याने फिरायला जाणं तसं फार चॅलेंजींंग काम आहे. पण काही लोकांना वेगळा अनुभव घेण्यासाठी सोलो ट्रिप करायची असते. सोलो ट्रिपमध्ये तुम्ही आपल्या मनाने जगू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणांचा मनमुराद आनंद घेऊ शकता. सोबतच सोलो ट्रिपने तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो. अशाच सोलो ट्रिपचं तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर पुष्करला भेट देऊ शकता. १६ नोव्हेंबरपासून पुष्कर जत्रेला सुरुवात होत आहे आणि हे ठिकाण सोलो ट्रिपसाठी बेस्ट मानलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे इथे तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम, अॅडवेंचर अॅक्टिविटी आणि वेगवेगळ्या स्पर्धांचाही आनंद घेता येतो.
पुष्कर हे धार्मिक स्थळ असलं तरी इथे केवळ बघण्यासाठी मंदिरेच आहेत, असं नाही. ट्रेकिंग पासून ते हॉट एअर बॅलूनिंग आणि क्विड बायकिंगसारख्या रोमांचक गोष्टीही तुम्ही इथे करु शकता.
फिरण्यासाठी आणखी काय?
सावित्री लेक
पुष्करला आल्यावर रत्नागिरी डोंगरावर स्थित सावित्री मंदिराला नक्की भेट द्या. कारण येथून दिसणारा नजारा केवळ फिरण्यासाठी आणि कॅमेरात कैद करण्यासाठीच नाही तर मनाला शांतता मिळवण्यासाठीही खास आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रोप वे ची सुविधा आहे. पण अॅडवेंचर म्हणून तुम्ही ट्रेकिंगचा पर्यायही निवडू शकता.
अनासागर लेक
अनासागर लेकमुळे पुष्करच्या सुंदरतेत दुपटीने भर पडते. सायंकाळी लेकचा नजारा फार सुंदर दिसतो. या तलावात तुम्ही बोटींगचा आनंदही घेऊ शकता. त्यासोबतच आजूबाजूचे अनेक लोकल स्ट्रीट फूड्सही चाखू शकता.
तारागढ किल्ला
राजस्थानच्या अजमेरमधील चौहान शासकांद्वारे तयार करण्यात आलेला तारागढ किल्लाही सुंदर आहे. हा किल्ला जगातल्या सर्वात जुन्या डोंगरातील किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दोन तासांचा प्रवास करावा लागतो, पण या प्रवासात तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही.
अजमेर
अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह हा अजमेर शरीफ या नावानेही ओळखला जातो. इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. सर्वधर्म समभावाचं हे मूर्तिंमंत उदाहरण आहे.
खिमसर किल्ला
राजस्थानच्या नागोर जिल्ह्यात खिमसर हा किल्ला आहे. हा किल्ला थार वाळवंटाच्या फार जवळ आहे. १६व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या किल्ल्यात राजपूत वास्तुकलेचा अद्वितीय असा नजारा बघायला मिळतो. आता हा किल्ला हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. ११ एकर परिसरात पसरलेली बाग या किल्ल्याचं खास आकर्षण आहे.
कसे पोहोचाल?
विमान मार्गे - जयपूरचं सांगनेर हे पुष्करचा पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. येथून पुष्करचं अंतर १४६ किमी आहे. एअरपोर्टहून इथे पोहोचण्यासाठी टॅक्सी करु शकता.
रेल्वे मार्ग - पुष्कर हे टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन अजमेर रेल्वे स्टेशनसोबत जोडलेलं आहे.
रस्ते मार्ग - पुष्करसाठी जयपूर, जोधपूर आणि अजमेर येथून सतत बसेस सुरु असतात. यात्रेदरम्यान इथे वाहतूकीसाठी आणखी जास्त सुविधा केली जाते.