कॅरिबियनमध्ये प्रियांकाचा सेकंड हनिमून; जाणून घ्या 'या' ठिकाणाची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:35 PM2019-01-14T15:35:16+5:302019-01-14T15:36:50+5:30
स्वित्झर्लन्डच्या सुंदर ऐल्प्स पर्वतरांगांमध्ये नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत केल्यानंतर आता बॉलिवूडची देसी गर्ल आपला पती निक जोनससोबत सेकंड हनीमून कॅरिबियन आयर्लन्डवर सेलिब्रेट करत आहे.
स्वित्झर्लन्डच्या सुंदर ऐल्प्स पर्वतरांगांमध्ये नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत केल्यानंतर आता बॉलिवूडची देसी गर्ल आपला पती निक जोनससोबत सेकंड हनीमून कॅरिबियन आयर्लन्डवर सेलिब्रेट करत आहे. यादरम्यान कॅरिबियन आयर्लन्डच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर बिकीनीमध्ये झोपाळ्यावर रिलॅक्स करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जाणून घेऊया सेलिब्रिटीज आणि लव्ह बर्ड्समध्ये कॅरिबियन बेट का एवढं प्रसिद्ध आहे त्याबाबत...
कॅरिबियन आयर्लन्ड फिरण्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. कॅरिबियन बेटाला जमिनीवरील स्वर्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसं पाहायला गेल तर सुंदर समुद्र किनारे आणि उंच-उंच डोंगरांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु कॅरिबियन बेटाचा एका बाजूला क्यूबादेखील आहे. येथे तुम्हाला क्यूबाचेही सौंदर्य अनुभवता येणार आहे.
लव्ह बर्ड्स आणि अॅडवेंचर्सची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण ही जागा मॉर्डन लिविंगपासून दूर आजही आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखली जाते. येथे निसर्ग सौंदर्याव्यतिरिक्त म्यूझिक, डान्स आणि कार्निवलचाही अनुभव घेता येतो. कॅरिबियन आयर्लन्डच्या प्रत्येक भागात तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेता येईल.
कॅरिबियन बेटाप्रमाणेच कॅरिबियन फूडचीही क्रेझ अनेक पर्यटकांमध्ये पाहायला मिळते. तुम्हाला येथे वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेता येईल. अशातच तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर कॅरिबियन आयर्लन्ड तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.