भारतातील सर्वात विचित्र ठिकाणांची नांव; ऐकलीत तर हसू आवरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:54 PM2018-09-06T12:54:00+5:302018-09-06T12:56:26+5:30

मुंबईसह देशभरातील रेल्वे स्टेशन्सची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एलफिन्सटन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी ठेवण्यात आलं, तर सीएसटी स्टेशनचं नाव बदलून सीएसटीएम (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स) असं ठेवलं गेलं.

railway station of india which has a funny name | भारतातील सर्वात विचित्र ठिकाणांची नांव; ऐकलीत तर हसू आवरणार नाही!

भारतातील सर्वात विचित्र ठिकाणांची नांव; ऐकलीत तर हसू आवरणार नाही!

googlenewsNext

मुंबईसह देशभरातील रेल्वे स्टेशन्सची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एलफिन्सटन स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी ठेवण्यात आलं, तर सीएसटी स्टेशनचं नाव बदलून सीएसटीएम (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स) असं ठेवलं गेलं. तसंच काहीसं उत्तरप्रदेशमध्ये सुरू आहे. उत्तरप्रदेशमधील मुगलसराय आता दीन दयाल उपाध्याय नगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर सध्या इलाहाबाद स्टेशनचं नाव बदण्याची तयारी सुरू आहे. काही लोकं या नाव बदलण्याच्या निर्णांयांमुळे नाराज आहेत, तर काही लोकांना याचा काहीच फरक पडत नाही. कितीही नावं बदलली तरीदेखील लोकांच्या तोंडून आपण जुनीच नावं ऐकतो. पण आज आपण देशभरातील अशा काही गावांबाबत पाहणार आहोत ज्यांची नावं फार विचित्र असून ती बदलण्याचा विचार करणं गरजेचं आहे. या गावांची नावं ऐकताच तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात या गावांबाबत...

1. हिमाचल प्रदेशमधील 'पूह'

तुमच्या समोर जेव्हाही कोणी पूह शब्द उच्चारतो त्यावेळी सर्वात पहिला विचार येतो तो म्हणजे बॉलिवूड चित्रपट 'कभी खुशी कभी गम'मधील करिना कपूरचा. पण आम्ही ज्या पूहबाबत सांगत आहोत त्याचा आणि करिना कपूरचा काहीही संबंध नाही. आम्ही ज्या पूहबाबत बोलत आहोत ते म्हणजे हिमाचल प्रदेशमधील एक छोटसं गाव आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच येथे मिळणाऱ्या बदामांसाठीही हे गाव ओळखलं जातं. 

2. पंजाबमधील 'काला बकरा'

पंजाब म्हटलं की आपल्या समोर उभं राहतं ते म्हणजे स्वर्ण मंदिर, सरसो का साग मक्के की रोटी आणि मोठा ग्लासभर लस्सी. पण पंजाबमधील एक गाव आपल्या विचित्र नावासाठीही ओळखलं जातं. जालंधरपासून 40 किलोमीटर अंतरावरील या गावाचे नाव काला बकरा आहे. या नावामागे अशी गोष्ट सांगण्यात येते की, एकदा कोणी एक बाबा एका फिरता फिरता एक काळा बकरा घेऊन या गावात आला आणि तेव्हापासून या गावाचं नाव काला बकरा असं ठेवण्यात आलं. 

3. उत्तरप्रदेशमधील भैंसा गाव

उत्तरप्रदेशमधील जौनापूर भागातील एका गावाचे नाव भैंसा असं आहे. या गावाचं नाव फार विचित्र असून अनेक लोकांना असं नाव देण्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही. 

4.  झारखंडमधील  दारू गाव

झारखंडमधील एका गावाचं नाव चक्क दारू आहे. या नावाचा उल्लेख अनेकदा विचित्र नावांच्या यादीमध्ये करण्यात येतो. 

5. ओदिशामध्ये आहे सिंगापूर रोड

ऐकून धक्का बसला का? पण हे विदेशातील सिंगापूर नसून हे उडिसामध्ये असलेल्या एका गावाचं नाव आहे. 

Web Title: railway station of india which has a funny name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.