पहिल्या महायुद्धावेळी वापरण्यात आलेला रेल्वे ट्रॅक होणार पुन्हा सुरू; कुठे आहे माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:04 PM2019-07-09T17:04:01+5:302019-07-09T17:07:32+5:30
सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर कर्नाटकातील जवळपास एक शतकाआधी तयार करण्यात आलेला रेल्वे ट्रॅक पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना?
(Image Credit : thebetterindia.com)
सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर कर्नाटकातील जवळपास एक शतकाआधी तयार करण्यात आलेला रेल्वे ट्रॅक पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? पण खरं हे खरं आहे. 1918मध्ये तयार करण्यात आलेला हा रेल्वे ट्रॅक सर्वात आधी पहिल्या महायुद्धादरम्यान वापरण्यात आला होता. हा रेल्वे ट्रॅक बेळगावपासून हुबलीपर्यंत तयार करण्यात आली होती. या रेल्वे लाइनवरून जाताना अंबेवाडी आणि दांदेली सहित चार रेल्वे स्टेशन्स येतात. पहिल्या महायुद्धाच्या वेळी या रेल्वे ट्रॅकवर वन्य विभागांतील गोष्टी आणि विशेषतः लाकड ने-आण करण्यासाठी या ट्रेनचा वापर केला जात असे.
(Image Credit : India Rail Info)
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांनंतर या रेल्वे लाइनवर प्रवाशांसाठी ट्रेन सुरू करण्यात आली. त्यानंतर 1994मध्ये येथील रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या. तेव्हापासून या मार्गावरून कोणतीही रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली नाही. तेथील एका स्थानिक नागरिकाने सांगितल्यानुसार, वीकेंडच्या दिवशी मुंबई आणि बंगळूरू मार्गावरून 2000 पेक्षाही जास्त पर्यटक दांदेली येतात.
जर या रेल्वे मार्गावरील सेवा सुरू करण्यात आली तर स्थानिक लोक आणि पर्यटकांना हुबली-धारवाड आणि वेलागावी पर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग अत्यंत सोपा होईल. सध्या येथून प्रवास करणारे प्रवासी दांदेलीपर्यंत रस्ते मार्गाने पोहोचतात.
दरम्यान, अब अलनावर-अंबेवाडी रेल्वे सेवा बहाल करण्यासाठी हुबली-धारवाड आणि दांदेली येथे राहणाऱ्या लोकांनी मागणी केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेनुसार, काम झालं तर एक महिन्यामध्येच रेल्वे मार्ग पुन्हा सुरू होईल.