पावसाळी ट्रेकला जायचंय... धाकधूक होतेय.. मग या सहा टिप्स वाचा आणि लक्षात ठेवा!
By admin | Published: July 8, 2017 06:20 PM2017-07-08T18:20:32+5:302017-07-08T18:20:32+5:30
ज्यांना मनापासून पावसाळी ट्रेकिंगला जायचंय त्यांनी छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या. काळजी घेवून ट्रेकिंग केलं तर पावसाळी ट्रेकिंग हा अविस्मरणीय अनुभव ठरतो.
- अमृता कदम
‘पाऊस कोसळतोय, वाटा काहीशा निसरड्या आहेत पण तरीही डोंगरमाथ्यावर पोहचायचंच आहे’. पावसाळ्यात करणाऱ्यांचा हा नेहेमीचा अनुभव. पावसाळातल्या ट्रेकिंगमध्ये असलेलं थ्रील अनुभवण्यासाठी अनेक हौशी लोक पाऊस पडू लागला की ट्रेकिंगसाठीच्या जागा शोधात. खरंतर अनेकांना पावसाळी टे्रकिंगला जावसं वाटतं पण मनात धाकधूक असते, यातले बारकावे माहित नसतात आणि नुसत्या आवडीवर कोणी साहस करायला धजावत नाही. पण असं असलं तरी ज्यांना मनापासून पावसाळी ट्रेकिंगला जायचंय त्यांनी छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या. काळजी घेवून ट्रेकिंग केलं तर पावसाळी ट्रेकिंग हा अविस्मरणीय अनुभव ठरतो.
4.फ्लिप-फ्लॉप्स
तुमच्या बॅगपॅकमधली अजून एक आवश्यक गोष्ट म्हणजे फ्लिप-फ्लॉपचा जोड. ट्रेकिंगदरम्यान तुम्ही मुक्काम करणार असाल तर तुमच्या पायांना फ्लिप-फ्लॉपमुळे आराम मिळेल. या बऱ्याचशा चप्पल वॉटरप्रूफ असल्यामुळे तुम्ही त्या घालून इकडे-तिकडे फिरूही शकता.
5.अँटी-फंगल क्रीम
पावसाळ्यामधलं दमट हवामान हे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीसाठी पोषक असतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स ही अगदी कॉमन गोष्ट असते. फंगल इन्फेक्शन्समुळे सूज येणं, खाज सुटणं असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे सामानामध्ये आठवणीनं अँटी-फंगल क्रीम ठेवावी.
6. आठवणीनं मीठ घ्या !
हो...मीठच! पॅकिंमधली ही बारकाईनं लक्षात ठेवायची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगमधल्या अडनिड्या वाटांवर तुम्हाला जळवांचा सामनाही करायला लागू शकतो. पायावर चढणाऱ्या या रक्तशोषक जळवांना दूर करण्यासाठीचं सहज साधन म्हणजे मीठ. मीठासोबतच लिंबाचा रस बरोबर ठेवू शकला तर खूपच चांगलं. पावसाळी ट्रेक म्हणजे धम्माल मस्ती आणि थ्रील. मात्र ते अनुभवायचं असेल, तर तुमची तयारी नीट झाली पाहिजे. म्हणूनच या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचा मॉन्सून ट्रेक एन्जॉय करा.