'या' कारणांमुळे भारतातील लोक फार कमी घेतात सुट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 05:41 PM2018-09-06T17:41:52+5:302018-09-06T17:43:10+5:30
वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते.
(Image credit : www.financialexpress.com)
काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीच्या सर्वे रिपोर्टनुसार, भारतीय तरुण दुसऱ्या देशांच्या तुलनेत फार कमी सुट्टी घेतात. रिपोर्टनुसार, वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते. यामुळे ते कंपनीकडून मिळणाऱ्या वार्षिक सुट्या संपवू शकत नाहीत. पण भारताचा याबाबतील चौथा क्रमांक आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश आहेत.
द हॉलिडे गिल्ट सिंड्रोम
सरकारी कंपनीचे कर्मचारी असोत वा प्रायव्हेट कंपनीचे. सर्वच लोक जास्त प्रमाणात द हॉलिडे सिंड्रोमने ग्रस्त असतात. असे लोक प्लन करुनही सुटी घेतात किंवा घेत नाहीत. असे जेव्हा सुटी घेण्याबाबत विचार करतात तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामांच्या असायनमेंट असतात. ही कामं कंपनीच्या फायद्यासाठी आणि करिअरच्या दृष्टीनेही पूर्ण करणे गरजेचे असते. अशात ते हे काम पूर्ण करण्यासाठी थांबतात आणि सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. असे लोक सुटी घेतली तरी लवकर ऑफिसला परत येतात.
प्रोजेक्ट पूर्ण करण्याची चिंता
प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्यांना मिळालेली असायनमेंट वेळेवर पूर्ण झाली तर ते न थांबता काम सतत काम करु शकतात. पण होतं असं की, एक असायमेंट पूर्ण झाल्यावर अशा लोकांना लगेच दुसरी असायमेंट दिली जाते. यामुळे त्यांचा सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. अनेकदा ऑफिसेसमध्ये हेही बघण्यात आले आहे की, ऑफिसमध्ये मेहनती लोकांना कामावर काम दिलं जातं, ज्यामुळे ते सुट्टीचं प्लॅनिंग करु शकत नाही. तेच कामचोर लोक भरपूर सुट्या घेतात आणि त्यांना कामाची चिंताही नसते.
डे आफ्टर टूमारो डिसऑर्डर
भारतात डे आफ्टर टूमॉरो डिसऑर्डरने ग्रस्त लोकांची संख्याही भरपूर आहे. ही स्थिती तेव्हा अधिक वाढते जेव्हा अनेक प्रयत्नांनंतरही काम पूर्ण होत नाही. अशात व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं. वेळेसोबतच काम पूर्ण करण्याची डेडलाइन जवळ येते. डेडलाइनच्या चिंतेत व्यक्ती काम पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे सुटी घेण्याचा वेळ निघून जातो.
बॉसची कामाची कटकट
बॉसचं कामासाठी सतत टोकत राहणं कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यापासून रोखतं. जर बॉस सतत म्हणत असेल की, काम खूप जास्त आहे, कसं केलं जाईल इत्यादी. तर याने कर्मचारीही सुट्टी घेण्याचा विचार करत नाहीत.
पुढे जाण्याची शर्यत
आज वेगाने स्पर्धा वाढत आहे. अशात जास्त दिवस सुटी घेणे जमत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने जास्त दिवस सुटी घेतली तर त्याचा सहकारी त्याच्या कामावर होल्ड मिळवतो. त्यामुळे त्याच्याकडून ते काम परत घेण्याची शक्यताही कमी असते. यामुळे अनेक कर्मचारी सुटी घेण्याचा विचार करत नाहीत.
या गोष्टींची घ्या काळजी
१) ऑफिसमध्ये तुम्ही काम करण्यासाठी जाता गप्पा करण्यासाठी नाही. त्यामुळे वेळेनुसार रोजचं काम रोज पूर्ण करत चला.
२) काम करतेवेळी अशा सहकाऱ्यांपासून दूर रहा जे आपलं काम करत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीवर वाद घालायला तयार असतात.
३) ज्या मुद्यावर तुम्हाला वाद घालायचा नाहीये, तो मुद्दा काढू नका.
४) सर्वांसोबत राहूनही आपले विचार सकारात्मक ठेवा आणि चांगलं काम करा. याचा विचार करा की, तुम्हाला तुमचं भविष्य ठरवायचं आहे. दुसरे काय विचार करुन काम करत आहेत याची काळजी करु नका.