भाडे आरक्षित डब्याचे, प्रवास जनरल कोचमधून अकोला-महू रेल्वे गाडीतील प्रकार; प्रवाशांची तक्रार
By admin | Published: February 17, 2016 12:24 AM2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30
आकोट: खंडवा मीटरगेज मार्गावरील अकोला-महू रेल्वे गाडीकरिता आरक्षित कोचचे भाडे वसूल करण्यात येत असून, प्रवाशांना प्रवास मात्र जनरल डब्यातून करावा लागत आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत आकोट येथील दिलीप जेस्वाणी यांनी तक्रार नोंदविली आहे.
Next
आ ोट: खंडवा मीटरगेज मार्गावरील अकोला-महू रेल्वे गाडीकरिता आरक्षित कोचचे भाडे वसूल करण्यात येत असून, प्रवाशांना प्रवास मात्र जनरल डब्यातून करावा लागत आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत आकोट येथील दिलीप जेस्वाणी यांनी तक्रार नोंदविली आहे. अकोला-खंडवा मीटरगेज मार्गावर धावणार्या अकोला-महू या रेल्वे गाडीला केवळ दोन आरक्षित कोच आहेत; मात्र एकच आरक्षित शयनयान देण्यात येतो. प्रशासन दुसर्या शयनयान कोचचे भाडे आकारत असले तरी प्रवाशांना जनरल डब्यामध्ये बसविले जाते. हा प्रकार दिलीप जेस्वाणी यांच्यासोबत घडल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या तक्रार पुस्तिकेत त्याबाबत तक्रार नोंदविली तसेच नांदेड डी.एम.आर. यांच्याकडेसुद्धा तक्रार केली आहे. याबाबत आकोट येथील स्टेशन मास्टर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वरिष्ठ स्तरावरून आरक्षित कोच ठरविले जात असल्याचे सांगितले. वरिष्ठांना प्रवाशांच्या तक्रारीसंदर्भात कळविल्याचेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)