रस्त्यातील खड्डा कसा खोल खोल...पुसेसावळी-वडी रस्त्यावरील प्रवास त्रासदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:54 PM2017-07-26T17:54:06+5:302017-07-26T20:46:44+5:30
पुसेसावळी (जि. सातारा), दि. २३ : खटाव तालुक्यातील पुसेसावळी-वडी रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. प्रवासादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे पाहून वाहनधारकांतच रस्त्यावरील खड्डा कसा खोल... खोल.. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या खटाव तालुक्यातील वडी येथील रस्त्यावरचा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. येथील खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे हे समजणेही अवघड झाले आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
या मार्गावरुन शालेय विद्यार्थी, प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतो. तसेच आठवडा बाजारामुळे या रस्त्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे हा खड्डा व रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील वाहनधारकांमधून होत आहे.