हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 04:04 PM2019-04-06T16:04:21+5:302019-04-06T16:09:57+5:30

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांनी त्यांच्या आत अनेक रहस्य दडवून ठेवले आहेत. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे.

Secret of Jagannath temple Kanpur who already told the rain is coming | हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं!

हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं!

Next

(Image Credit : The Divine India)

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांनी त्यांच्या आत अनेक रहस्य दडवून ठेवले आहेत. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे. असे म्हणतात की, हे मंदिर पावसाची योग्य भविष्यवाणी करतं. तसेच असेही म्हटले जाते की, जर पाऊस येणार असेल तर यां मंदिराचं छत कडक उन्हातही टपकू लागतं आणि पावसाला सुरुवात होताच या मंदिराच्या छतातून पाणी टपकणं बंद होतं. 

हे मंदिर कानपूरच्या भीतरगांव विकासखंडापासून तीन किमी असलेल्या बेहटा गांवात आहे. हे मंदिर भगवान जगन्नाथ यांचं प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान जगन्नाथ, बलदाऊ आणि सुभद्रा यांच्या मूर्ती आाहेत. प्रांगणात सूर्यदेव आणि पद्मनाभन यांच्या मूर्ती आहेत. जगन्नाथ पुरीप्रमाणे या गावातही भगवान जगन्नाथाची यात्रा काढतात. येथील लोकांची मंदिरावर फार श्रद्धा आहे. लोक दर्शनासाठी दूरुन येतात. 

येथील लोक सांगतात की, पाऊस होण्याच्या सहा-सात दिवसांपूर्वी मंदिराच्या छतातून पाण्याचे थेंब टपकू लागतात. इतकेच नाही तर ते सांगतात की, ज्या आकाराचे थेंब टपकतात त्याच आधारावर पाऊस होतो. यात हैराण करणारी बाब ही आहे की, इथे जशीही पावसाला सुरुवात होते, मंदिराचं छत आतून पूर्णपणे कोरडं होतं. 

हे मंदिर किती जुनं आहे आणि याच्या छतातून पाणी कसं टपकतं किंवा बंद होतं याची माहिती आजपर्यंत मिळू शकलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिराचे पुजारी सांगतात की, पुरातत्त्व विभागाचे लोक आणि वैज्ञानिका अनेकदा इथे येऊन गेलेत, पण या रहस्याची माहिती मिळवण्यात अपयशी ठरले. 

(Image Credit : tripadvisor.in)

पुरातत्व विभागाला केवळ इतकंच माहीत आहे की, या मंदिराचा जीर्णोद्धार ११व्या शतकात करण्यात आलं होतं. या मंदिराची बनावट एखाद्या बौद्ध मठाप्रमाणे आहे. याच्या भींती १४ फूट जाड आहेत. तसेच हे मंदिर सम्राट अशोक यांच्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. पण मंदिराच्या बाहेर मोराची निशाणी आणि चक्रही आहे. यांवरून असंही म्हटलं जातं की, हे मंदिर सम्राट हर्षवर्धन कार्यकाळातील असावं. 

Web Title: Secret of Jagannath temple Kanpur who already told the rain is coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.