समर कॅपला मुलांना पाठवाताय? आयोजकांना हे ७ प्रश्न विचारा, नाहीतर पस्तावाल!

By admin | Published: May 6, 2017 05:50 PM2017-05-06T17:50:15+5:302017-05-06T17:50:15+5:30

समर कॅम्प, अ‍ॅडव्हेंचार कॅम्पला मुलांना पाठवताय, पण त्या आयोजक आणि कॅम्पयाविषयी तुम्हाला माहिती काय आहे?

Send a summer cap to the children? Ask these organizers 7 questions, or ask Pasta! | समर कॅपला मुलांना पाठवाताय? आयोजकांना हे ७ प्रश्न विचारा, नाहीतर पस्तावाल!

समर कॅपला मुलांना पाठवाताय? आयोजकांना हे ७ प्रश्न विचारा, नाहीतर पस्तावाल!

Next

-गौरी पटवर्धन

उन्हाळ्याची सुट्टी लागली की घराघरातून समर कॅम्पची चर्चा सुरु होते. कुठल्या कॅम्पला जायचं? अ‍ॅडव्हेंचर का आटर््स? नाटक की स्विमिंग? स्केटिंग की हॅण्डरायिटंग? असे अनेक कॅम्प्स आता प्रत्येक लहानमोठ्या शहरात घेतले जातात. त्यात मुलाचा/मुलीचा वयोगट आणि आर्थिक निकष लावून कुठला कॅम्प ते ठरवलं जातं. यात अनेक वेळा मुलं ‘‘आमचा सगळा ग्रूप अमुक ठिकाणी जाणार आहे’’ असं म्हणून तिथली फी भरायला लावतात. त्यातही निवासी अ‍ॅडव्हेंचर कॅम्पला जायची मुलांना अतिशय हौस असते. पालकही असा विचार करतात की मुलं मित्रमैत्रिणींबरोबर जातील, नवीन ओळखी होतील, घरापासून लांब राहण्याची सवय होईल तर जाऊदे मुलांना.
बहुतेक पालक जिथे मुलांना पाठवायचं आहे त्या ग्रूपची वरवर चौकशी करतात. राहण्याची जागा सुरक्षित आहे का? जेवण चांगलं असेल ना? इतपतच प्रश्न पालक विचारतात. कारण त्यात नेमकं काय बघायचं हेही माहिती नसतं कारण अजून आपल्याकडे अ‍ॅडव्हेंचर कॅम्प किंवा एकूणच कॅम्पिंगची संस्कृती खूप नवीन आहे. आयोजक नवखे असतात आणि पालक बहुदा स्वत: अशा ठिकाणी कधीच गेलेले नसतात. पण तरीही आपलं मूल जिथे ५-६ दिवस राहायला जाणार आहे त्याबद्दल किमान काही गोष्टींची चौकशी केलीच पाहिजे.
त्यामुळे मुलाला कुठल्याही कॅम्पला पाठवण्यापूर्वी आयोजकांना हे प्रश्न विचाराच.
१. अ‍ॅडव्हेंचर कॅँपच्या आयोजकांपैकी कोणी त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे का?
२. आयोजकांपैकी कोणी डॉक्टर आहे का? किंवा किमान पॅरामेडिकलचा कोर्स केलेला आहे का? कँपच्या जागेपासून दवाखाना किती लांब आहे? आणीबाणीच्या वेळी मुलांना दवाखान्यापर्यंत नेण्याची काय सोय आहे?
३. कॅम्प साईटवरच्या मेडिकल किट मध्ये काय काय आहे? आपल्याकडच्या अनेक कॅम्प साईट्सवर साप, विंचू असू शकतात. अनेक प्रकारच्या माशा आणि किटक असतात. यातल्या कोणी मुलाला दंश केला तर आयोजक त्याला प्रथमोपचार करू शकतात का?
४. स्विमिंग शिकवणार असतील तर किती मुलांमागे एक प्रशिक्षक असेल? प्रत्येक मुलाला देता येईल इतके फ्लोट्स आहेत का? स्विमिंग कुठे शिकवणार आहेत? आपल्याकडे दुर्दैवाने नदी, बंधारा, धरण यातलं पाणी अतिशय गढूळ असतं. त्यात जर कोणी बुडायला लागलं तर तो मुलगा कुठे बुडला हेच दिसत नाही त्यामुळे त्याला वाचवणं फार जास्त अवघड होऊन बसतं.
५. आपल्याकडचं पाणी बहुतेक वेळा अशुद्ध असल्यामुळे कॅम्पला पाठविण्यापूर्वी मुलाला कसली लस देण्याची गरज आहे का हे आपल्या डॉक्टरला विचारलं पाहिजे.
६. रायफल शूटिंग, घोडेस्वारी अशा अ‍ॅक्टिव्हिटी असतील तर त्यात काय काय अपघात होऊ शकतात हे आयोजकांना लक्षात आलंय का? ते अपघात टाळण्यासाठी ते पुरेशी काळजी घेतील ना? घेऊ शकतील ना? रायफल हाताळतांना चुकून गोळी उडू शकते. रायफल कधीही गंमतीत कोणावर रोखायची नसते. शूटिंग चालू नसेल तर रायफलची नळी आकाशाकडेच करून ठेवलेली असली पाहिजे. प्रत्येक घोड्याचा स्वत:चा स्वभाव असतो, तो समजून न घेता घोड्याला हात लावणं योग्य नाही. या गोष्टी आयोजकांनी प्रात्यिक्षकाच्याही आधी मुलांना सांगितल्या पाहिजेत.
७. कॅम्पसाइट ला आग लागली तर तिथे ती विझविण्यासाठी पाणी, वाळूने भरलेल्या बादल्या, फायर एस्टिंग्विशर आहे का?

८. किमान एवढ्या गोष्टी तरी मुलांना कँपला पाठवण्यापूर्वी विचारल्या पाहिजेत. आणि अजून एक तितकीच महत्वाची गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे आपल्या मुलांना हे पक्क बजावलं पाहिजे की आयोजकांचं म्हणणं शब्दश: ऐकायचं. अनेक वेळा असंही दिसतं की आईवडिलांपासून लांब आल्यानंतर, विशेषत: अर्धवट वयाची मुलं कानात वारं शिरलेल्या वासरासारखं वागतात. आयोजकांचं ऐकत नाहीत. मुलं मजा करायला गेलेली असतात, त्यात एका वयाची मुलं जमली की एकूण त्यांची वृत्ती न ऐकण्याकडेच झुकलेली असते, आणि ते साहजिकही आहे. मात्र डोंगर, धबधबा, पाणी, प्रवास या मस्ती करण्याच्या जागा नाहीत हे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. आणि हे पक्कं समजल्यानंतर मुलांना जरूर अशा ठिकाणी पाठवलं पाहिजे कारण वाढीच्या वयात मुलांना हे सगळे अनुभव, ते वातावरण, तो थोडासा स्वतंत्र झाल्याचा फील मिळणं फार आवश्यक असतं.
बहुतेक वेळा कॅम्पसचे आयोजक सिन्सिअर असतात आणि खरंच त्या विषयाची आवड असणारे असतात. मात्र आपण आयोजकांकडून या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं घेतली पाहिजेत. ते प्रशिक्षित आहेत याची खात्री करून घेतली पाहिजे.

patwardhan.gauri@gmail.com

 

Web Title: Send a summer cap to the children? Ask these organizers 7 questions, or ask Pasta!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.