SHOCKING : ​मुंबईतील "या" 5 भयानक ठिकाणांची आपणास कल्पनाही नसेल....!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 11:44 AM2017-04-28T11:44:20+5:302017-04-28T17:14:20+5:30

मुंबईतही असे काही ठिकाणे आहेत, जेथील भूतांच्या कथा प्रचलित आहेत. चला जाणून घेऊया मुंबईतील ५ भूतांच्या ठिकाणांबाबत ज्याठिकाणी भूतांचे अस्तित्व असल्याचे समजते.

SHOCKING: You can not imagine the "5 terrible places" in Mumbai ....! | SHOCKING : ​मुंबईतील "या" 5 भयानक ठिकाणांची आपणास कल्पनाही नसेल....!

SHOCKING : ​मुंबईतील "या" 5 भयानक ठिकाणांची आपणास कल्पनाही नसेल....!

Next
ong>-Ravindra More
आपण सर्वांनी कधीना कधी भूत, आत्मा आणि भूतांच्या ठिकाणांबाबत वाचले किंवा ऐकले असेलच. अशा ठिकाणी आपली जाण्याची इच्छा तर होते, मात्र त्याठिकाणच्या परिस्थितीशी आपण लढू नाही शकत. मुंबईतही असे काही ठिकाणे आहेत, जेथील भूतांच्या कथा प्रचलित आहेत. चला जाणून घेऊया मुंबईतील ५ भूतांच्या ठिकाणांबाबत ज्याठिकाणी भूतांचे अस्तित्व असल्याचे समजते. 

Vrindavan-Society-1

* वृंदावन सोसायटी 
वृंदावन सोसायटीच्या बिल्डिंग नंबर ‘६ ब’मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्यानंतर लोकांना त्या व्यक्तीच्या भूताकडून थापड मारल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. त्यानंतर काही दिवसाने सोसायटीच्या वाचमॅनलादेखील रात्रीच्या वेळी जोरदार थापड पडल्याची घटना समोर आली. याशिवाय याठिकाणी लोकांना अन्य असाधारण हालचालींचा अनुभव येत होता. 

397877-1

* आरे मिल्क कॉलनी
या कॉलनीला मुंबईतील भूतांचे सर्वात भयानक ठिकाण मानले जाते. या भागात रात्री १० वाजेनंतर एक महिलेचा आत्मा लोकांकडून लिफ्ट मागताना दिसत असे. येथे राहणारे लोक इतरांना सावध करतात की, ज्यांना या भयानक परिस्थितीपासून वाचायचे असेल तर त्यांनी रात्री १० वाजेनंतर या भागात जायायचे नाही आणि जाणे गरजेचेच असेल तर कोणालाच लिफ्ट देऊ नये.  

Image result for tower of silence in mumbai

* टावर आॅफ सायलेंस
हे एक विना छताचे टॉवर आहे, जिथे पारसी आपल्या धर्मानुसार मरणाºयाच्या शवाला अंतिम पडावासाठी ठेऊन जातात. सांगितले जाते की, याचा पहाडी रस्ता, कित्येक भूतांनी आणि आत्मांनी घेरलेला आहे. म्हणून रात्री या भागात जाण्याची हिंमत कोणी करत नाही. 
 
Related image

* माहिम- डिसूजा चाळ
माहिमच्या डिसूजा चाळीमध्ये एका महिलेचे भूत दिसत असते. ही महिला विहिरीत पाणी भरताना पाण्यात पडून मृत्यु झाली होती. यानंतर लोकांनी चाळीच्या कॉरिडोरमध्ये या महिलेचा आत्मा फिरताना पाहिला होता.  असे म्हटले जाते की, या विहिरीतून एका महिलेचा ओरडण्याचा आवाज येत असतो. 

* ठाकुर कॉलेज
या कॉलेजच्या बेसमेंटमध्ये बिपाशा बासुचा ‘आत्मा’ या चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. यादरम्यान चित्रपटाच्या कॅमेरामॅनने एका फोटो फ्रेमला स्वत:च डाव्या आणि उजव्या बाजूने हलताना चित्रित केले होते.  जे स्वत: बिपाशानेही पाहिले होते. बिपाशा सांगते की, फोटो फ्रेम कुणाचाही धक्का न लागता स्वत:च खाली पडली आणि डाव्या आणि उजव्या बाजूला सरकू लागली. 

Web Title: SHOCKING: You can not imagine the "5 terrible places" in Mumbai ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.