येथे लोकांना बोलण्यास आहे मनाई, कारण वाचून धक्का बसेल; पण तिथे जायची इच्छा होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 04:55 PM2022-02-13T16:55:49+5:302022-02-13T16:58:07+5:30

असे काही लोक आहेत,ज्यांना वर्षातील एक दिवस मनशांतीसाठी काढतात. त्यांच्याकडे या सक्तीची नाही पण परंपरा आहे आणि संपूर्ण शहर या परंपरेत सामील होते.

silence day tradition in Bali | येथे लोकांना बोलण्यास आहे मनाई, कारण वाचून धक्का बसेल; पण तिथे जायची इच्छा होईल

येथे लोकांना बोलण्यास आहे मनाई, कारण वाचून धक्का बसेल; पण तिथे जायची इच्छा होईल

Next

किंचिंत मिनिटांसाठी शांत राहणे किती कठीण आहे. जरा विचार करा, तुम्हाला जर दिवसभर शांत रहायचे असेल तर? पूर्ण दिवस कोणाशी बोलण्यास तुम्हाला मनाई केली तर? हे सर्व करणे किती कठीण असेल, परंतु असे काही लोक आहेत,ज्यांना वर्षातील एक दिवस मनशांतीसाठी काढतात. त्यांच्याकडे या सक्तीची नाही पण परंपरा आहे आणि संपूर्ण शहर या परंपरेत सामील होते.

इंडोनेशियातील सुंदर शहर असलेल्या बालीमध्ये अशी परंपरा आहे ज्याला न्येपी असे म्हणतात. तसेच इंग्रजीत ‘डे ऑफ सायलेन्स’ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते बाली कॅलेंडरनुसार इसाकावरसा (साकाचे नवीन वर्ष ) साजरा केला जातो. हा एक हिंदू सण आहे, जो बालीमध्ये साजरा केला जातो. या दिवशी एक राष्ट्रीय सुट्टी असे. यादिवशी बालीतील लोक शांततेत बसून ध्यान करतात. न्येपीच्या दिवशी कोणीही कोणाशीही बोलणार नाही आणीबाणीच्या सेवांव्यतिरिक्त, बाजार आणि वाहतूक सेवा बंद असतात.

यादिवशी काही लोक संपूर्ण दिवस उपवास करतात. संपूर्ण दिवस निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बालीचे तरुण पुरुष ‘ओमेद-ओमेदन’ किंवा ‘द किसिंग रिचुअल’ प्रथेचे भागीदार बनतात, ज्यामध्ये ते एकमेकांच्या कपाळाबद्दल अभिवादन करतात आणि नवीन वर्षांचे शुभेच्छा देतात. या दिवशी भारतात ‘उगादी’ साजरा केला जातो. न्येपीचा हा एक दिवस आत्म-प्रतिबिंबित करण्यासाठी आरक्षित आहे.

या दिवशी मुख्य बंदी आग लावण्यावर आहे. घरातही मध्यम प्रकाश केला जातो. या दिवशी काही काम केले जात नाही. यादिवशी मनोरंजन कार्यक्रमावर देखील प्रतिबंध आहे. कोणीही कुठेही प्रवास करत नाही, बोलण्यावरही यादिवशी बंदी आहे. रस्त्यांवर या दिवशी कोणतीही हालचाल नसते. फक्त सुरक्षा रक्षक असतात ज्यांना ‘पिकालॅंग’ म्हटले जाते. हे लोक नागरिकांकडून या दिवसाचे व्यवस्थित पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतात.

या परंपरेचे पालन बालीमध्ये राहणारे हिंदूं करतात. याशिवाय, हे प्रतिबंध इतर धर्मांतील लोकांना लागू होत नाहीत. त्यांच्याकडे काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. न्येपीनंतर देशातील लोक दुस-या दिवशी पुन्हा एकदा आपली जुनी दिनचर्या सुरू करतात.

Web Title: silence day tradition in Bali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.