नवीन वर्षाचं हे खास टूर पॅकेज पाहिलं की नाही? कमी पैशात जास्त मजा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:09 PM2020-01-01T17:09:27+5:302020-01-01T17:13:51+5:30

नवीन वर्षाचा आज पहीला दिवस आहे. संपूर्ण वर्ष आनंदाच आणि भरभराटीचं जाण्यासाठी प्रत्येकजण संकल्प करत आहे.  

Special New Year tour package from IRCTC | नवीन वर्षाचं हे खास टूर पॅकेज पाहिलं की नाही? कमी पैशात जास्त मजा...

नवीन वर्षाचं हे खास टूर पॅकेज पाहिलं की नाही? कमी पैशात जास्त मजा...

Next

नवीन वर्षाचा आज पहीला दिवस आहे. संपूर्ण वर्ष आनंदाचं आणि भरभराटीचं जाण्यासाठी प्रत्येकजण संकल्प करत आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला जर तुम्ही जर कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  कमीतकमी पैशात तुम्ही भारतातल्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.  ज्यांना नवीन वर्षाच्या सुरूवातीला देवदर्शन करायचं आहे. ते  लोकं सुध्दा देवदर्शन करू शकतात.  आईआरसीटीसीने एक खास पॅकेज तुमच्यासाठी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आणलं आहे. चला तर मग जाणून घेऊया या खास पॅकेजबद्दल.


या पॅकेजमध्ये तुम्हाला शनिशिंगणापूर, शिर्डी तसंच दक्षिण भारतातील महाबलीपूरम आणि रामेश्वर तसंच कन्याकुमारीसह अनेक  ठिकाणांना भेट देता येणार आहे. ही ठिकाणं फिरण्यासाठी तुम्हाला अत्यंत कमी पैसे मोजावे लागणार आहेत. 

शिर्डी  हे प्रसिध्द धार्मीक स्थळ आहे. या ठिकाण दर्शन घेण्यासाठी अनेक  भाविक येत असतात.  या पॅकेज मधील ही ट्रेन ८  जानेवारीला नवी दिल्ली मधून  सकाळी ९ वाजता निघणार आहे . तसंच यामधून शिर्डी आणि शनिशिंगणापूर या ठिकाणी फिरवण्यात येईल. यासाठी एका व्यक्तीला जवळपास १४ हजार रुपये इतका खर्च येणार आहे. तसंच दोन व्यक्तींसाठी  २० हजारापर्यंत खर्च येणार आहे.

दक्षिण भारतातील एका सहलीचे खास पॅकेज आहे. ज्यात पर्यटकांना  धार्मिक स्थळांना भेटी देता येणार आहेत. याची सुरूवात ३ जानेवारी २०२०मध्ये होणार  आहे.  या पॅकेजमध्ये ७ रात्री आणि ८ दिवसांचा समावेश आहे. तिरूचिरापल्ली, तंजावुर, मदुरै, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, महाबलीपुरम आणि कांचीपुरम यांचा समावेश असणार आहे. 

 भारतात फिरण्यासाठी हे पॅकेज खूप स्पेशल आहे. कारण यात प्रतापगढ़, अमेठी, रायबरेली, लखनऊ, कानपुर आणि झांसी या ठिकाणी तुम्हाला फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. विशाखापट्टणमचे सुध्दा खास पॅकेज आहे.  ज्यात ९ रात्र आणि १०  दिवसांचा समावेश आहे. 

Web Title: Special New Year tour package from IRCTC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.