परदेशात फिरण्यासाठी चांगली संधी हवीये? तर वाट कसली पाहताय पटापट बुक करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:16 PM2020-01-05T17:16:54+5:302020-01-05T17:21:16+5:30
भरपूर लोकांना फिरण्याची खूप आवड असते
भरपूर लोकांना फिरण्याची खूप आवड असते. तुम्हाला सुद्धा जर या वर्षी थंडिचा आनंद घेण्यासाठी फिरायला जावसं वाटत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भटकंती करण्याची आवड असलेल्या नागरिकांसाठी एक चांगली संधी आहे. जगातल्या सगळ्यात उंच इमारती आणि बुर्ज खलिफा पासून क्रुजची सफर करण्याची मजाच काही वेगळी आहे. पण परदेशी जाताना होणारा खर्च पाहून आपण ठरवण्याच्या आधी खूप विचार करत असतो. पण जर तुम्हाला दुबईला जायचं असेल तर दुबईला फिरायला जाण्यासाठी जास्त खर्च येत नाही.
भारतीय रेल्वेने म्हणजेच आईआरसीटीसीने परदेशातील यात्रेसाठी एक खास टूर पॅकेज आणलं आहे. कारण आईआरसीटीसीचे हे पॅकेज दुबई आणि अबू धाबी या ठिकाणचं असणार आहे. हे पॅकेज पाच दिवस आणि चार रात्रीचं आहे. तसंच या पॅकेजमध्ये पर्यटकांना बुर्ज खलीफा दाखवण्यात येणार आहे. यासोबतच लोकं क्रूज राईटची आणि मिरॅकल गार्डनची मजा घेऊ शकतात.
या टूर पॅकेजमध्ये खास गोष्ट ही आहे की यात बेली डान्स बघताना तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. तसंच अनेक समुद्र किनारे दाखवण्यात येतील. तसंच शॉपिंग करण्याची हौस असलेल्या लोकांसाठी दूबई हे खूप खास ठिकाण मानलं जातं. तुमच्या खिशाला आरामशीर परवडेल अशा किमतीत तुम्ही भरपूर खरेदी या ठिकाणी करू शकता.
यासाठी तुम्हाला १६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या काळात कामातून सुट्टी मिळवणं आवश्यक आहे. कारण हे पॅकेज खास त्यादिवसांसाठीच आहे. त्यासाठी तुम्हाला हे दिवस तुम्हाला मोकळे ठेवावे लागतील. या पॅकेजप्रमाणे १६ फेब्रुवारीला स्पाईसजेट एयरलाइंसने तुम्हाला जयपूर ते दुबईला जाता येणार आहे. परत २१ तारखेला हे विमान दुबईवरून जयपूर या ठिकाणी लँण्ड होणार आहे.
या पॅकेजचा आनंद तुम्हाला एकट्याला घ्यायचा असेल तर महाग पडू शकतं. याऊलट फिरायला जाण्यासाठी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर ते खर्चाच्या मानाने बरं पडेल. एका व्यक्तीसाठी या टूरचा खर्च ६५ लाख ९१० रुपये इतका येणार आहे. तर २ व्यक्तींसाठी हा खर्च ५७ हजार २० रुपये इतका येणार आहे. तर तीन व्यक्तींसाठी ५६ हजार ७५५ इतका खर्च येणार आहे. तर तुम्हाला दुबईला जायचं असेल तर वेळ न घालवता लगेच तयारीला लागा.