वॉटर पार्कमध्ये धमाल-मस्ती कराच, पण 'या' गोष्टींकडेही लक्ष द्याच!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 11:34 AM2019-04-01T11:34:42+5:302019-04-01T11:36:28+5:30
वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्याचा उत्साह कधी कधी इतका असतो की, अनेक गोष्टींकडे लक्षच दिलं जात नाही. त्यामुळे तुमच्या आनंदात मिठाचा खडा पडू शकतो.
(Image Credit : Wikipedia)
उन्हाळ्याला सुरुवात होताच लोक उन्हाच्या झळांपासून बचावासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात. काही लोक थंड ठिकाणांवर किंवा जंगलांमध्ये फिरायला जातात. तर काही लोक विकेंडला वॉटर पार्कमध्ये पाण्यात एन्जॉय करतात. वॉटर पार्कला या दिवसात अधिक गर्दी असते. पण वॉटर पार्कला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल.
पूर्वी लोकांकडे फिरायला जाण्याचे पर्याय कमी असायचे. पण आज शहरांमध्ये अशा डेस्टिनेशनची कमतरता नाही. वॉटर पार्क अशीच एक सुरक्षित जागा आहे. इथे परिवार किंवा मित्रांसोबत तुम्ही क्वालिटी टाइम एन्जॉय करू शकता. वॉटर पार्कला जाताना खालील गोष्टींची काळजी नक्की घ्यावी.
१) वॉटर पार्कला जाताना एक एक्स्ट्रा बॅग सोबत न्यावी. ज्यात तुम्ही तुमचे आणि लहान मुलांचे कपडे ठेवू शकाल. याने ना तुमचे कोरडे खराब होईल ना भिजलेल्या कपड्यांना सांभाळण्याचं टेन्शन राहील.
२) वॉटर पार्कमध्ये मस्ती केल्यानंतर शॉवर घेणे गरजेचे आहे. यासाठी सोबत एक बाथिंग सूट किंवा कपड्याचा एक वेगळा जोड घेऊन जावा. तसेच सोबत एक्स्ट्रा टॉवेलही असावेत.
३) सूर्य आग ओकायला लागला आहे. अशात सूर्याच्या घातक किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन सोबत ठेवा. ३० ते ५० एसपीएफ असलेलं सनस्क्रीन स्कीनसाठी चांगलं मानलं जातं. बाहेर उन्हात निघण्यापूर्वी साधारण अर्धा तास आधी सनस्क्रीन चांगल्याप्रकारे शरीरावर लावा. स्विमींग केल्यानंतर सनस्क्रीन पुन्हा एकदा शरीरावर चांगल्याप्रकारे लावा.
४) वॉटर पार्कला जाताना पॅकिंग करताना हा विचार करू नका की, तिथे जास्त कपड्यांची काय गरज असेल. पण तुम्हाला तिथे काय स्थिती असेल हे आधीच माहीत नसतं. त्यामुळे सोबत कपडे ठेवा. तसेच शॅम्पू, टॉवेल, साबण आणि चप्पल ठेवा.
लहान मुलांची घ्या अशी काळजी
वॉटर पार्कचं नाव ऐकताच आपणा सर्वांचाच उत्साह वाढतो आणि कधी एकदाचे तिथे जाऊन पाण्यात उड्या घेऊ याची घाई लागलेली असते. पण वॉटर पार्कमध्ये पाण्यात उतरताच लहान मुलांना विसरू नका. त्यांची सुरक्षा सर्वातआधी व्हायला पाहिजे. तसेच वेगवेगळ्या राइडचा अनुभव घेतानाही लहान मुला-मुलींकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या डोळ्यांवर पाण्यात जाताना गॉगल लावा. जेणेकरून पाणी डोळ्यात जाणार नाही.