भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:46 PM2018-08-24T13:46:07+5:302018-08-24T13:47:33+5:30

वेगवेगळ्या लहान मोठ्या आकारांचे शिवलिंग तुम्ही प्रत्येक मंदिरात पाहिले असेलच. पण भारतात एक असंही मंदिर आहे जिथे केवळ एक नाही तर चक्क एक कोटी शिवलिंग आहेत. 

Temple in karnataka where are 9 million shivalingas | भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण?

भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण?

Next

भारतात भगवान शिव यांचे अनेक सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये वर्षभर पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी बघायला मिळते. अनेक मंदिरे तर देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. या शिव मंदिरांमधील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी लोक दूरदुरुन येतात. वेगवेगळ्या लहान मोठ्या आकारांचे शिवलिंग तुम्ही प्रत्येक मंदिरात पाहिले असेलच. पण भारतात एक असंही मंदिर आहे जिथे केवळ एक नाही तर चक्क एक कोटी शिवलिंग आहेत. 

कुठे आहे हे मंदिर?

साधारण ९ मिलियन म्हणजेच एक कोटी शिवलिंग असलेलं हे मंदिर कर्नाटकातील कोटिलिंगेश्वर मंदिर आहे. मान्यतांनुसार, जेव्हा भगवान इंद्राला गौतम नावाच्या एका साधूने श्राप दिला होता तेव्हा त्यातून मुक्ती मिळावी यासाठी त्यांनी कोटिलिंगेश्वर मंदिरात शिवलिंगांची स्थापना केली होती. या श्रापातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान इंद्राने येथील शिवलिंगांचा अभिषेक १० लाख नद्यांच्या पाण्याने केला होता. तेव्हापासून हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. 

मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगाची स्थापना

रंगीबेरंगी दगडांवर ठेवलेल्या या शिवलिंगांना पाहणे एक वेगळाच अनुभव देतं. या मंदिरात दिवसेंदिवस शिवलिंगांची संख्या वाढत आहे. याचं कारण म्हणजे ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते ते इथे एक शिवलिंग स्थापन करतात. श्रावण आणि महाशिवरात्रीला ही संख्या दुप्पट होते. परदेशातूनही लोक इथे येतात. 

जगातलं सर्वात उंच शिवलिंग

याच मंदिरामध्ये देशातील सर्वात उंच शिवलिंग स्थापन केलं आहे. या शिवलिंगाची उंची १०८ फूट इतकी आहे. याच शिवलिंगाच्या चारही बाजूने एक कोटी छोटे छोटे शिवलिंग स्थापन केले आहेत. यासोबतच इथे श्री गणेशा आणि कुमारस्वामी यांच्याही प्रतिमा आहेत. या मंदिरात ३५ फूट उंच आणि ६० फूट लांब आणि ४० फूट रुंद नंदीची मूर्तीही आहे. 
 

Web Title: Temple in karnataka where are 9 million shivalingas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.