Travel Tips: भारतात 'या' ठिकाणी पाणी वाहते खालून वर, निसर्गाच्या चमत्कारामागे आहे धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:34 PM2022-03-11T19:34:26+5:302022-03-11T20:35:07+5:30

पाणी खालच्या बाजुने वरच्या बाजुकडे वाहत जाते. रस्त्यावर उभी असलेली न्यूट्रल गाडी येथे  मीटरपर्यंत डोंगरावर चढत जाते.

these are the places in India where water flows from downwards to upwards | Travel Tips: भारतात 'या' ठिकाणी पाणी वाहते खालून वर, निसर्गाच्या चमत्कारामागे आहे धक्कादायक कारण

Travel Tips: भारतात 'या' ठिकाणी पाणी वाहते खालून वर, निसर्गाच्या चमत्कारामागे आहे धक्कादायक कारण

Next

छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील मॅनपाट हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. छत्तीसगडचे शिमला अशी याची ओळख आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी एक जागा ‘उल्टा पानी’ येथेच आहे. येथे पाणी खालच्या बाजुने वरच्या बाजुकडे वाहत जाते. रस्त्यावर उभी असलेली न्यूट्रल गाडी येथे  मीटरपर्यंत डोंगरावर चढत जाते. गुरुत्वाकर्षणापेक्षा मॅग्नेटिक फील्ड मॅनपाटच्या या जागेवर जास्त आहे, पाणी किंवा गाड्यांना जी वरच्या बाजुला नेते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, अशा ६४ जागा जगभरात आणि भारतात अशा ५ जागा आहेत.

भौतिकशास्त्राचे प्राध्यापक एके पाणिग्रही यांनी सांगितले की, वरच्या बाजुने पाणी तेव्हाच जाते, त्या ठिकाणी जेव्हा गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त प्रभावी शक्ती असेल. पाणी किंवा गाड्यांना हीच शक्ती वर ओढते. उल्टा पाणी या जागेवर अनेक अशा शक्ती असू शकतात, ज्यामुळे पाणी वर जाते. हा एक शोधाचा विषय आहे. याबाबत माहिती देताना मॅनपाटचे पर्यटन अधिकारी सुरेंद्र वर्मा यांनी सांगितले की, लोक या जागेला आणि या प्रकाराला काही वर्षांपर्यत भुताटकी समजायचे. पर्यटन विभागाच्या प्रचारानंतर लोकांमध्ये जागरुकता आली आणि येथे पर्यटकांची संख्या वाढली.

भारतातील पाच जागा

  • लेह- लद्दाख
  • तुलसी श्याम अमरेली- गुजरात
  • कालो डुंगर कच्छ- गुजरात
  • जोगेश्वरी विकरौली लिंक रोड- मुंबई
  • उल्टापानी, मॅनपाट- छत्तीसगड

Web Title: these are the places in India where water flows from downwards to upwards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.