हिवाळ्यातील ट्रिप होईल खास; 'या' ठिकाणांची करा सैर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:10 PM2019-11-04T13:10:01+5:302019-11-04T13:11:05+5:30
हिवाळा सुरू झाला असून वातावरणातही गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात अनेक लोक फिरायला जाण्यासाठी प्लान करत असतात. पण अनेकजण प्लान करताना कनफ्युज असतात.
(Image Credit : Japji travel)
हिवाळा सुरू झाला असून वातावरणातही गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात अनेक लोक फिरायला जाण्यासाठी प्लान करत असतात. पण अनेकजण प्लान करताना कनफ्युज असतात. थंडीत फिरायला जाण्याचा प्लॅन करण्याआधी कोणत्या ठिकाणाची निवड करावी? ते बजेटमध्ये असेल ना? यांसारख्या अनेक प्रश्नांनी हैराण व्हायला होतं. अशातच आज आम्ही तुम्हाला काही ऑप्शन्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही हटके डेस्टिनेशन्स निवडू शकता आणि एन्जॉय करू शकता.
जैसलमेर
राजस्थानमधील जैसलमेर शहराला गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं. थंडीत जैसलमेर फिरण्याचा प्लान करू शकता. राजस्थान फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
उत्तर प्रेदशमधील वाराणसी फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या शहरातील छोटे रस्ते आणि गंगा घाट पाहण्यासाठी अनेक देशी विदेशी पर्यटक येथे येत असतात. थंडीत वाराणसी ट्रिप प्लान करू शकता. येथे स्ट्रिट फूड आणि शॉपिंग करण्यासाठी अनेक ऑप्शन आहेत.
मसूरी
उत्तराखंडमधील मसून अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे. हिवाळ्यात येथील वातावरण फार थंड असतं. हिवाळ्यात येथे फिरण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. हे ठिकाण तुमच्या बजेटमध्येही आहे.
काश्मीर
काश्मिरचा नाव ऐकताच मन रोमांचने भरून जातं. हिवाळ्यात काश्मिरमध्ये स्नोफॉल होतो. काश्मिरला जमिनीवरील स्वर्ग म्हटलं जातं.
गुजरात
गुजरातमध्ये थंडीत तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता. कच्छ आणि भुज यांसारख्या शहरांमध्ये फिरू शकता. हिवाळ्यात येथील फेस्टिव्हल्सही एन्जॉय करू शकता.
दार्जिलिंग
डोंगरांमध्ये उंचावर चहाचे मळे पाहण्याची इच्छा असेल तर दार्जिलिंगला फिरण्यासाठी नक्की जा. ऑक्टोबरचा महिना येथे फिरण्यासाठी उत्तम काळ आहे. येथे तुम्ही दार्जिलिंगच्या ट्रेनमध्ये फिरण्याचा अनुभव घेऊ शकता. तसेच येथील निसर्गसौंदर्य पाहून तुमचं मन प्रसन्न होईल.