Games of Thrones सारखे झकास लोकेशन भारतातही आहेत, एकदा नक्की द्या भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 12:39 PM2019-01-18T12:39:30+5:302019-01-18T12:49:40+5:30
जगभरात गेम ऑफ थ्रोन्सची किती क्रेझ आहे हे काही आता वेगळं सांगण्याची गरज नाही. यातील पात्रांपासून ते लोकेशनपर्यंत सगळ्याच गोष्टी कमालीच्या लोकप्रिय आहेत.
जगभरात गेम ऑफ थ्रोन्सची किती क्रेझ आहे हे काही आता वेगळं सांगण्याची गरज नाही. यातील पात्रांपासून ते लोकेशनपर्यंत सगळ्याच गोष्टी कमालीच्या लोकप्रिय आहेत. हे लोकेशन पाहताना एकदा तरी तिथे जाता यावं असा विचार अनेकांच्या मनात नक्कीच येऊन जात असेल. तुम्हालाही तसंच वाटत असेल भारतातही तसे लोकेशन काही कमी नाहीयेत. गेम ऑफ थ्रोन्सच्या काही लोकेशनसोबत मिळते जुळते लोकेशन भारतात बघायला मिळतात. चला जाणून घेऊ त्या लोकेशनबाबत....
GOT मधील नॉर्थ ऑफ द वॉल आणि लडाखची जंस्कार व्हॅली
गेम ऑफ थ्रोन्समधीस नॉर्थ ऑफ द वॉल लोकेशन तुम्हाला चांगलंच आठवत असेल. चारही बाजूने केवळ बर्फाची पांढरी चादर आणि गोठलेला तलाव. हुबेहुब असाच नजारा तुम्हाला जंस्कार व्हॅली लडाखमध्ये बघायला मिळू शकतो. हे ठिकाण अॅडव्हेंचरस डेस्टिनेशन म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय आहे.
GOT मधील किंग्सरोड आणि उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट
सेवन किंगडम्समध्ये किंग्सरोड सर्वात मोठा आणि शानदार हायवे आहे. असाच मिळता जुळता हायवे तुम्हाला जिम कॉर्बेटमध्ये बघायला मिळू शकतो. इथे आल्यावर तुम्हाला वाटेल की, तुम्ही किंग्सरोड लोकेशनवर फिरत आहात.
GOT मधील ड्रॅगनस्टोन आणि जयपूरचा मेहरानगढ किल्ला
ड्रॅगनस्टोन कॅसल, नदीच्या किनारी तयार मोठी हवेली तुम्हाला जयपूर मेहरानगढ किल्ल्याची आठवण देईल. महाराजा मान सिंग यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. जगभरात हा किल्ला लोकप्रिय आहे.
GOT मधील इंपोजिंग वॉल आणि उत्तराखंडमधील फॉरेस्ट रिझर्व्ह इन्स्टिट्यूट
क्वॉर्थ इंपोजिंग वॉलची झलक बघायती असेल तर उत्तराखंडमधील फॉरेस्ट रिझर्व्ह इन्स्टिट्यूटमध्ये भेट द्या. हे ठिकाण सिनेमाच्या आणि सीरिजच्या शूटिंगसाठी लोकप्रिय लोकेशन आहे.
GOT मधील मीरिन आणि उदयपूरचा लेक पॅलेस
नदीच्या अगदी मधोमध आणि सुंदर असलेला हा मीरिन पॅलेस दिसायला हुबेहुब उदयपूरच्या पॅलेस सारखाच आहे. इथे बॉलिवूडच्या कितीतरी सिनेमांचं शूटिंग करण्यात आलं आहे.
GOT रिव्हरलॅंड आणि मेघालयातील उमियम लेक
द किंगडम ऑफ रिव्हरलॅंडचा नजारा बघायचा असेल तर मेघालयातील उमियन लेकला भेट देण्याचा प्लॅन करा. या शांत आणि सुंदर तलावाला बघताना तुम्हाला वेळेचं भान राहणार नाही.