फार रहस्यमयी आहेत ही ठिकाणं; पण जाण्यासाठी आहे मनाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 04:49 PM2018-11-16T16:49:08+5:302018-11-16T16:51:34+5:30
जगभरामध्ये अनेक अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे एकदा तरी जावं अशी आपली इच्छा असते. मग त्यामागे कोणतंही कारण असू शकतं. अनेकांना तेथील संस्कृती पाहण्यासाठी जावसं वाटतं तर अनेकांना तेथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी.
जगभरामध्ये अनेक अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे एकदा तरी जावं अशी आपली इच्छा असते. मग त्यामागे कोणतंही कारण असू शकतं. अनेकांना तेथील संस्कृती पाहण्यासाठी जावसं वाटतं तर अनेकांना तेथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी. कारण कोणतंही असो परंतु प्रत्येकजण आपल्या फेवरेट डेस्टिनेशनवर जाण्यासाठी उत्सुक असतं. तुम्हाला आज काही खास जागांबाबत सांगणार आहोत. कदाचित या ठिकाणांना तुम्ही भेट दिली असती तर ही ठिकाणं तुमच्या फेवरेट ठिकाणांपैकी एक असती. परंतु या ठिकाणांमागे काहीना काही इतिहास दडला असला तरीदेखील येथे जाण्यावर मनाई आहे.
1. द वेटिकन लायब्ररी, वेटिकन सिटी
जगभरातील सर्वात जुनी लायब्ररी म्हणून ओळखली जाणारी ही लायब्ररी एक रहस्यमयी लायब्ररी म्हणूनही ओळखली जाते. परंतु या लायब्ररीला भेट देण्याची परवानगी कोणालाही देण्यात येत नाही. येथे फक्त काही विशेषतज्ज्ञ भेट देऊ शकतात. असं म्हटलं जातं की. या लायब्ररीमध्ये अशी अनेक पुस्तकं आहेत ज्यांमध्ये अनेक रहस्यमयी माहिती देण्यात आली आहे. तसेच या लायब्ररीमध्ये एलियनसोबत संपर्क करण्यात आल्याचे अनेक पुरावे देण्यात आले आहेत.
2. बहिमियन ग्रोव, अमेरीका
कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या 2700 एकरच्या या कंपाउंडमध्ये काही नशीबवान लोकचं जाऊ शकतात. हा एक प्रायवेट आर्ट क्लब असून बहिमियन क्लबची प्रॉपर्टी आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बहिमियन क्लब येथे दोन आठवड्यांचा कॅम्प लागतो. ज्यामध्ये जगभरातील काही प्रभावशाली व्यक्तीच सहभागी होऊ शकतात.
3. स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट, नॉर्वे
सीड वॉल्ट नॉर्थ पोलपासून 800 मैल अंतरावर असलेलं हे ठिकाण जगभरातील सीड बँक म्हणून ओळखलं जातं. येथे जगभरातील अनेक बियाणं जपून ठेवण्यात आली आहेत. जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यामध्ये एखादी प्रजाती नष्ट झाली तर त्यापासून बचाव करणं सहज शक्य होतं.
4. लास्को गुहा, फ्रान्स
यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलेलं हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहेत. 2008नंतर या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. या गुहेच्या भितींवर प्राचीन काळापासूनच्या कला रेखाटलेल्या आहेत. परंतु येथे फंगल इन्फेक्शन पसरल्यामुळे येथील सरकारला ही गुफा कायमसाठी बंद करणं भाग पडलं. एखाद्या संशोधनासाठी फक्त इतिहासकारांनाच येथे जाण्याची परवानगी देण्यात येते.
5. स्नेक आइलॅन्ड, ब्राझील
43 हेक्टर पसरलेल्या या आयलॅन्डवर जगभरातील सर्वात विषारी साप आढळून येतात. येथे जवळपास 4 हजार साप आहेत. ब्राझीलचे सरकार येथे काही वर्षांपासून काही बायॉलॉजिस्ट आणि रिसर्चर्सला जाण्याची परवानगी देण्यात येतं.