तिकिटांच्या रांगेतून होणार सुटका
By admin | Published: July 7, 2015 10:56 PM2015-07-07T22:56:07+5:302015-07-07T22:56:07+5:30
तिकिटांच्या रांगेतून होणार सुटका
Next
त किटांच्या रांगेतून होणार सुटकामोबाईल तिकिट सेेवेचा पश्चिम रेल्वेवर आजपासून शुभारंभमुंबई - पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल तिकिट सेवा काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. मात्र या सेवेत मोबाईलवर आलेल्या माहीतीनंतरही प्रवाशांना तिकिटाची एटीव्हीएम मशिनवरुन प्रिंट काढावी लागते. यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याने त्यात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यात बदल करुन मोबाईलवरच लोकलचे तिकिट ग्राह्य धरण्यासाठी योजना आखण्यात आली असून त्याचा शुभारंभ पश्चिम रेल्वे मार्गावर होत आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते बुधवारी हा शंुभारंभ केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी मोबाईल तिकीट सेवा काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. गुगल प्ले आणि विंडोज स्टोअरमधून मोबाईल तिकीट सेवा डाऊनलोड केल्यानंतर ही सेवा प्रवाशांना उपलब्ध होत आहे. प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव यात नोंदवावे लागते. त्यानंतर अनेक प्रक्रिया पार पडल्यानंतर स्थानकावर जाऊन युनिक बुकींग आयडीव्दारे एटीव्हीएमवर तिकिटांची प्रिंट मिळते. मात्र या सर्व प्रक्रियेत बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याने या सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळू लागला. प्रवाशांचा हा मनस्ताप दूर करण्यासाठी अखेर रेल्वे प्रशासनाने मोबाईलवरील तिकिटच ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर काम सुरु केले. प्रथम चेन्नईत याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईकरांसाठी ही सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. या सेवेचा प्रवाशांनी गैरवापर करु नये यासाठी इस्त्रोचीही मदत घेण्यात आली. अखेर सर्व तांत्रिक समस्या दूर केल्यानंतर प्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील या सेवेचा बुधवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीतूनच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे शुभारंभ केला जाणार आहे.