जमिनीखाली ३ हजार फूटावर असलेल्या गावाबद्दल कधी ऐकलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 02:42 PM2018-12-13T14:42:10+5:302018-12-13T14:43:34+5:30

जंगलात राहणाऱ्या वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांबाबत तुम्ही ऐकलं-वाचलं असेल. पण अमेरिकेतील जमिनीखाली ३००० हजार फूट खाली असलेल्या गावाबद्दल कधी ऐकल का?

Tiny American village hidden three thousand feet below the ground | जमिनीखाली ३ हजार फूटावर असलेल्या गावाबद्दल कधी ऐकलंय का?

जमिनीखाली ३ हजार फूटावर असलेल्या गावाबद्दल कधी ऐकलंय का?

Next

जंगलात राहणाऱ्या वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांबाबत तुम्ही ऐकलं-वाचलं असेल. पण अमेरिकेतील जमिनीखाली ३००० हजार फूट खाली असलेल्या गावाबद्दल कधी ऐकल का? कदाचित काहींना माहितीही असेल. पण जास्तीत जास्त लोकांना हे गाव माहितीच नाही. 

जमिनीखाली आहे गाव

आज जेव्हा काही अंडरग्राऊंड हॉटेल आणि रिझॉर्टमध्ये लोक एक दिवस राहण्यासाठी लाखों रुपये खर्च करण्यासाठी तयार आहेत. अशात एक पूर्ण गावच जमिनीखाली राहतंय. मीडिया रिपोर्टनुसार, या गावात राहणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण हे लोक इथे गेल्या १ हजार वर्षांपासून राहतात. त्यांचं हे गाव पाहण्यासाठी जगभरातील लोक भेट देत असतात. 

कुठे आहे हे गाव?

हे गाव अमेरिकेतील प्रसिद्ध ग्रॅंड कॅनियनजवळ हवासू कॅनियनमध्ये सुपाई नावाने ओळखलं जातं. हे एक असं गाव आहे जे जमिनीपासून खाली तीन हजार फूटावर वसलेलं आहे. त्यामुळे अर्थातच हे गाव बघण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसते. हेच कारण आहे की, दरवर्षी जगभरातून ५५ लाख लोक हे गाव बघण्यासाठी येतात. हवायू कॅनियनजवळ एक खोल दरी असून या दरीत हे गाव वसलेलं आहे. तर या गावाची एकूण लोकसंख्या ७३० इतकी सांगितली जाते. हे लोक अमेरिकेतील मूळ निवासी रेड इंडियन आहेत. 

अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. पण हे वास्तव आहे. आजही हे ठिकाण बाहेरील जगाच्या संपर्कात नाहीये. कारण इथे वाहतुकीसाठी फार कमी साधनं आहेत. इथे एकतर पायी किंवा जनावरांच्या मदतीने पोहोचता येतं. त्यामुळेच असेही म्हटले जाते की, जगात या गावासारखं दुसरं गाव नाहीये. 

Web Title: Tiny American village hidden three thousand feet below the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.