'ही' आहेत जगातील 37 सर्वोत्तम शहरे; जाणून घ्या, टॉप-10 मध्ये कोणी मारली बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:04 PM2021-09-11T12:04:59+5:302021-09-11T12:06:31+5:30
top 10 best cities in the world in 2021 : या यादीत अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराला जगातील सर्वोत्तम शहर म्हणून वर्णन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : तुम्हाला जगातील सर्वात सुंदर शहरांबाबत माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय जागतिक नियतकालिक टाइम आउटने (Time Out) जगातील सर्वोत्तम शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराला जगातील सर्वोत्तम शहर म्हणून वर्णन करण्यात आले आहे. (top 10 best cities in the world in 2021 according to time out reveals)
टाईम आऊटने कोरोना संकटाच्या काळात काही मानकांच्या आधारावर ही यादी तयार केली आहे, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, संस्कृती आणि नाइटलाइफच्या आधारे शहरांची निवड करण्यात आली आहे.
ही आहेत जगातील 10 सर्वोत्तम शहरे...
1. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका
2. अॅमस्टरडॅम, नेदरलँड
3. मँचेस्टर, युनायटेड किंगडम
4. कोपेनहेगन, डेन्मार्क
5. न्यूयॉर्क, अमेरिका
6. मॉन्ट्रियल, कॅनडा
7. प्राग, चेक रिपब्लिक
8. तेल अवीव, इस्रायल
9. पोर्टो, पोर्तुगाल
10. टोकियो, जपान
टॉप 37 शहरांमध्ये...
लॉस एंजेलिस, शिकागो, लंडन, बार्सिलोना, मेलबर्न, सिडनी, शांघाय, माद्रिद, मेक्सिको सिटी, हाँगकाँग, लिस्बन, बोस्टन, मिलान, सिंगापूर, मियामी, दुबई, बीजिंग, पॅरिस, बुडापेस्ट, अबू धाबी, साओ पाउलो, जोहान्सबर्ग, रोम, मॉस्को, ब्युएनोस आयर्स आणि इस्तंबूल यासारख्या शहरांचा समावेश आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमधील फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे...
पर्यटनाच्या दृष्टीने, सॅन फ्रान्सिस्को शहर देखील एक उत्तम ठिकाण मानले जाते. सॅन फ्रान्सिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज येथील खाशियत आहे. 1937 मध्ये बांधलेला हा पूल तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिला असेल. याचबरोबर, येथील डोलोरेस पार्कमध्ये तुम्ही विश्रांतीचे काही क्षण घालवू शकता. ही जागा ज्यूंची स्मशानभूमी होती, त्यानंतर याला उद्यानाचा आकार देण्यात आला. गोल्डन गेट पार्क देखील सुंदर आहे. हे न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्क पेक्षा मोठे आहे. पर्वत, झाडे आणि बागांव्यतिरिक्त, येथे एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही आहे.