जगातले 4 सर्वात रोमांचक टूरिस्ट स्पॉट, इथे जाण्यासाठी करावी लागते मोठी हिंमत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:52 AM2018-05-28T11:52:47+5:302018-05-28T11:52:47+5:30
आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशाच काही टुरिस्ट स्पॉटबद्दल सांगणार आहोत, जिथे जाणे मोठी रिस्क घेण्यासारखेच आहे. पण तरीही जगभरातील पर्यटक इथे मोठी गर्दी करतात.
जगभरातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याची आवड असते. कुणाला रोमॅंटिक जागेवर पसंत असतं तर कुणाला धार्मिक स्थळांना जाणं आवडतं. काही लोकांना अशा ठिकाणी जाणं जिथे त्यांना रोमांचक काहीतरी करायला मिळेल. रोमांचक प्रवास करणाऱ्यांसाठी ही माहिती उपयोगी पडू शकते. आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशाच काही टूरिस्ट स्पॉटबद्दल सांगणार आहोत, जिथे जाणं मोठी रिस्क घेण्यासारखेच मानले जाते. पण तरीही जगभरातील पर्यटक इथे मोठी गर्दी करतात.
1) जेन एन टॉवर युनशान, चीन
चीन हा देश आपल्या इतिहासासाठी आणि सुंदरतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील वेगवेगळी ठिकाणे नेहमीच प्रेक्षकांचं आकर्षण राहिली आहेत. पण त्यात एक खास ठिकाण सध्या चांगलंच गाजतंय. इथे चाय पिंग शहराच्या डोंगरावर असलेलं एक घर पर्यटकांचं फारच लक्ष वेधून घेत आहे. या घराच्या आजूबाजूचा सुंदर निसर्गही अनेकांना प्रेमात पाडतोय. रोमांचक गोष्ट म्हणजे या घराजवळ जाण्यासाठी हजारों पायऱ्या चढून जाव्या लागतात.
2) इटली, पोन्टे वेकियो
इटलीच्या फिरेन्डे शहरातील पोन्टे वेकियो नदीवर असलेला हा पुल 1345 वर्ष जुना आहे. या पुलावर असलेली दुकाने आणि घरे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. यावर ज्याप्रकारे घरे बांधण्यात आली आहेत ते पाहून कुणालाही आश्चर्यच होतं.
3) हॅगिंग मॉनेस्ट्री, चीन
शांझीमध्ये असलेला हेंग माउंटेन चीनमधील सर्वात धोकादायक डोंगरांपैकी एक आहे. या उंच डोंगरांच्या कडेला लोकांनी घरे बांधली आहेत. ही घरे पाहिल्यावर ती हवेत झुलत असल्यासारखी वाटतात. ही घरे आणि डोंगर पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.
4) अलहजारा, यमन
यमन आपल्या उंचच उंच डोंगरांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यातील एक डोंगरावर एक सुंदर शहर वसवलं आहे. या शहराला अलहजारा असे म्हटले जाते. हे शहर 12व्या शतकात तयार करण्यात आलं होतं. डोंगरांना पोखरुन हे शहर वसवण्यात आलंय.