नेहमीच्या ठिकाणांना कंटाळलात? ही ठिकाणे देऊ शकतात तुम्हाला अद्वितीय आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 02:20 PM2018-04-30T14:20:25+5:302018-04-30T14:20:25+5:30

या ठिकाणांवर तुम्ही पैसा वसूल मजा करु शकता. चला जाणून घेऊया अशात खास ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत जाऊ शकता.

Tourist place where you can plan your trip with your children | नेहमीच्या ठिकाणांना कंटाळलात? ही ठिकाणे देऊ शकतात तुम्हाला अद्वितीय आनंद

नेहमीच्या ठिकाणांना कंटाळलात? ही ठिकाणे देऊ शकतात तुम्हाला अद्वितीय आनंद

googlenewsNext

तुम्ही त्याच त्या नेहमीच्या ठिकाणांवर फिरायला जाऊन जाऊन कंटाळले असाल आणि या उन्हाळ्यात तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांवर तुम्ही पैसा वसूल मजा करु शकता. चला जाणून घेऊया अशात खास ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत जाऊ शकता.

1) नामिक रामगंगा व्हॅली

तुम्हाला सुंदरतेसोबतच अॅडव्हेंचरचा अनुभव देणाऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही उत्तराखंडमधील नामिक रामगंगा व्हॅलीला जाऊ शकता. उत्तराखंडातील पिथौरगढ जिल्ह्यातील रामगंगा नदीचा प्रवास तुम्हाला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाणारा ठरेल. येथील कला-परंपरा अनेक पर्यटकांचं लक्ष आकर्षित करुन घेत आहेत. इथे तुम्हाला ट्रेकिंग करण्यासाठीही अनेक जागा आहेत. 

(उन्हाळ्याच्या सुट्टीत या अॅम्युझमेंट पार्कला भेट देऊन करा धमाल-मस्ती)

2) कालिंपाँग

कालिंपाँग हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक पर्यटनस्थळ आहे. कालिंपाँग उत्तर बंगालमध्ये हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून ते दार्जीलिंगपासून ५० किमी अंतरावर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकला सिलिगुडीसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ३१ ए कालिंपाँगमधूनच जातो. न्यू जलपाईगुडी हे भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक येथून ७० किमी अंतरावर आहे. उन्हाळ्यात सुट्टी घालवण्यासाठी हे बेस्ट डेस्टिनेशन मानलं जातं. इथे तुम्ही सुंदर डोंगरामध्ये सायकलींग, ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता.  इथे तुम्हाला कधीही न अनुभवलेली शांतता अनुभवायला मिळेल.

3) शिलॉंग

शिलॉंगमध्ये तर तुम्हाला फिरण्यासाठी कितीतरी जागा आहेत. येथील सुंदर रिसॉर्टनी पर्यटकांना चांगलंच आकर्षित केलंय. येथील सुंदर, शांत आणि दूरपर्यंत पसरलेला उमियाम तलाव तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा अनुभव देईल. येथील लाबंच लांब पाईनची झाडे नेहमीत पर्यटकांना भुरळ घालणारे ठरले आहेत. समुद्र सपाटीपासून 1,520 मीटर उंचीवर असलेल्या शिलॉंगमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. त्यात खासकरुन क्रिनोलिन फॉल्स, गुन्नर फॉल्स हे लोकप्रिय ठिकाणे आहेत. त्यासोबतच हॅप्पी व्हॅली आणि स्वीट वॉटर फॉलही प्रसिद्ध आहे. 

(परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? हे ठिकाण ठरु शकतं चांगला पर्याय)

4) कॉर्बेट नॅशनल पार्क, नैनीताल आणि मसूरी

लहानांसोबतच मोठ्यांनाही प्राणी बघण्याची आणि जंगलात सफर करण्याची खास आवड असते. अशा ठिकाणाचा तुम्ही शोध घेत असाल तर कॉर्बेट नॅशनल पार्क हे बेस्ट ठिकाण आहे. या नॅशनल पार्कमध्ये तब्बल 160 वाघ असून ते त्यांना बघण्याचा अद्वितीय आनंद तुम्ही घेऊ शकता. या नॅशनल पार्कमध्ये वाघ, हत्ती, हरीण, अस्वल असे वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात. तसेच इथे 600 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षीही तुम्ही बघू शकता. 

5) बासुंती

जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना स्वीमिंग करण्याची किंवा फिशींग करण्याची आवड असेल तर तुम्ही बासुंतीला नक्की भेट द्यायला हवी. हिमाचल प्रदेशातील या छोट्याशा हिल स्टेशनवर तुम्हाला कधीही न अनुभवलेली शांतता अनुभवता येईल. हे ठिकाण योगासाठी चांगलंच प्रसिध्द आहे. येथील हेल्दी फूड, शांत वातावरण, स्वच्छ हवा, सुंदर हॉटेल्स पर्यटकांना आकर्षित करत आहे. शहरातील धावपळीच्या जगण्यातून काही काळ शांतता मिळवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट मानलं जातं.

Web Title: Tourist place where you can plan your trip with your children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.