समुद्र सफरीचा आनंद घेतील महाराष्ट्रातील पर्यटक, सिंधुदुर्गात सुरू होणार टुरीस्ट सबमरीन सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 05:03 PM2020-01-26T17:03:20+5:302020-01-26T17:09:21+5:30
ऑस्ट्रोलियामध्ये एका टेक्नॉलॉजी कंपनी द्वारे अंडर वॉटर सबमरीन सेवेची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(image credit- worldwildlife.org)
ऑस्ट्रोलियामध्ये एका टेक्नॉलॉजी कंपनी द्वारे अंडर वॉटर सबमरीन सेवेची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेचा लाभ महाराष्ट्रातले पर्यटक सुद्धा घेऊ शकतात. महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग टुरीस्ट सबमरीन सेवा सुरू करणार आहे.
या उपक्रमासाठी राज्य सरकार कडून २५ करोड रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्याचं टेंडर काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र टूरिज्म डिवेलपमेंट कॉर्पोरेशन (MTDC) चे एमटी अभिमन्यू काळे यांनी या योजनेविषयी माहीती देताना असं सांगितलं की सिंधुदुर्गातील पर्यटकांसाठी टुरीस्ट सबमरीन सुरू केलं जाणार आहे. ( हे पण वाचा-जगातलं आठवं आश्चर्य चॉकलेट हिल्स, फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!)
अभिमन्यु काळे असं म्हणाले की यात २४ लोकांच्या बसण्याची सोय केली जाणार आहे. जवळपास २० मिनिटांपर्यंत पर्यटकांना समुद्राच्या आत फिरता येणार आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारने या संकल्पनेसाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. पण आचारसंहीता सुरू झाल्यामुळे हे काम अद्याप सुरू झाले नव्हते. पण सध्या हे काम परत सुरू करण्यात आले आहे. पर्यटकांना अशी अपेक्षा आहे की या वर्षीच्या शेवटापर्यंत हे काम पुर्ण व्हायला हवं.
ऑस्ट्रियामध्ये पर्यटकांना समुद्राच्या जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी मागच्या वर्षी अंटर वॉटर सबमरीनची सेवा सूरू करण्यात आली आहे. यामुळे निसर्गप्रेमींना निसर्ग जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. सबमरीन्स पासून क्विंसलॅंडच्या समुद्रात असलेले बॅरिअर रिफ पाहण्यासाठी लोकांना एप्लिकेशनच्या माध्यातून बुकिंग करावं लागणार आहे. सुरूवातीला ही सेवा फक्त मर्यादित ग्राहकांना दिली जाणार आहे. ( हे पण वाचा-सुंदर आणि स्वच्छ बीचसाठी गोवा नाही, तर राज्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट!)