ह्दयविकाराने कल्याणच्या रेल्वे प्रवाशाचे डोंबिवलीत निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:21 PM2018-01-18T12:21:14+5:302018-01-18T12:24:43+5:30
रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.
डोंबिवली: रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.
साळुंखे हे बांद्रा येथे एका खासगी कंपनीत कार्यरत होते, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जात असतांना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कल्याण स्थानकातून अंबरनाथ-सीएसएमटी जलद ही लोकल पकडली होती. दरम्यान त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने सहप्रवाशांनी डोंबिवली स्थानकात उतरवले, त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना तातडीने स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात नेत, शास्त्रीनगर रुग्णालयात हलवले, परंतू तेथे सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. त्यानूसार त्यांच्या वारशांना कळवण्यात आले, माहिती मिळताच मयत जयवंत यांचे ज्येष्ठ बंधू सुरज साळुंखे यांनी ओळख पटवल्याचे सांगण्यात आले. मयत साळुंखे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेची डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जानेवारी महिन्यात या पोलिस ठाण्यांतर्गत मृत्यूची नोंद करण्यात आलेल्यांमध्ये आतापर्यंत ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले.