ट्रेनचा प्रवास आरामदायक होण्यासाठी 'या' टीप्स नक्की ठरतील फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 01:43 PM2020-01-11T13:43:12+5:302020-01-11T13:52:35+5:30
ट्रेनने प्रवास सुरू करण्याआधी खूप गोष्टींची तयारी करावी लागतं असते.
ट्रेनने प्रवास सुरू करण्याआधी खूप गोष्टींची तयारी करावी लागत असते. खूप गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. फ्लाईट किंवा कारपेक्षा ट्रेनने प्रवास करणं खूप फायदेशीर ठरतं असतं. तसंच ट्रेनने प्रवास केल्यास खर्च सुद्धा कमी येत असतो. पण त्यासाठी ट्रेनचं कंन्फॉम तिकीट हवं असणं गरजेचं असतं. त्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं. अनेक लोकांना सुट्टीच्या दिवसात लांबचा प्रवास करायचा असतो. अशावेळी जर कंन्फॉम तिकीट नसेल तर खूप त्रास सहन करत इच्छीत ठिकाणी पोहोचावं लागतं. जर तुम्हाला सुध्दा अशाच स्थितीचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होईल.
ऑनलाइन प्लेटफॉर्मचा वापर
(image credit- FreeKaMaal)
तर तुम्हाला ट्रेनचं तिकिट बूक करायचं असेल तर ऑनलाईन तिकीट बूक करा. स्टेशनला न जाता तुम्ही तिकीट बुक करू शकता. तसंच कॅन्सल सुध्दा करू शकता. यासाठी ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉम सुध्दा तुमची मदत करेल. याशिवाय तुम्हला यात बोनस, सवलत तसंच वेगवेगळ्या सेवांचा फायदा घेता येऊ शकतो.
अडवांस बुकिंग
शक्यतो तुम्हाला रेल्वेने ज्या आठवड्यात प्रवास करायचा असेल त्याच्या आधीच बुकिंग करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला कंन्फॉम तिकिट मिळण्याची शक्यता जास्त असते. पण जर ऐनवेळी तुम्ही बुकिंग करायचा विचार करत असाल तर तुम्हाला तिकिट मिळणार कि नाही या बाबत माहीती मिळत नाही.
सुट्टिच्या दिवशी प्रवास करणं टाळा
जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी जाणं टाळा कारण त्यावेळी अनेक लोकं फिरण्यासाठी किंवा आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करत असतात. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. पण जर तुम्ही शनिवार- रविवार किंवा सुट्टीचा दिवस सोडता प्रवास केला तर तुमचा प्रवास सुखकर होईल. कारण तुलनेने इतर दिवशी गर्दी कमी असेल.
पीएनआर स्टेटस तपासा
कोणत्याही प्रवासाला सुरूवात करण्यासाठी त्या ट्रेनचा पीएनआर स्टेटस नक्की तपासून बघा. कारण काहीवेळा ट्रेनला स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागू शकतो. अशावेळी तुम्ही जर सामानासह ट्रेनची वाट पाहत असाल तर वेळ वाया जाण्याची शक्यता असते. असं होऊ नये यासाठी पीएनआर स्टेटस तपासून मगच प्रवासासाठी बाहेर पडा.