Travel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 01:33 PM2017-10-01T13:33:16+5:302017-10-01T19:03:16+5:30

एकट्याने प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. याच गोष्टीचा तर महिलांना जास्त त्रास होतो. मात्र, आता आम्ही अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा प्रवास अगदी सोप्पा होऊन जाणार आहे.

Travel Tips: Women should remember 'or' tips while traveling alone! | Travel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स!

Travel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स!

Next
ट्याने प्रवास करायचा म्हटलं की, महिलांच्या भारी जीवावर येतं. खरंय ना? कारण तुमचाही अनुभव काही वेगळा नसणारच. एकट्याने प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. याच गोष्टीचा तर महिलांना जास्त त्रास होतो. मात्र, आता आम्ही अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा प्रवास अगदी सोप्पा होऊन जाणार आहे. माहिती आहेत काय आहेत या टिप्स? तर जाणून घ्या आणि अनुभवा जग तुमच्या स्वत:च्या जिज्ञासेने...

१. तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर तुमचे राहण्याचे ठिकाण आधीपासून योग्य पद्धतीने बुक करुन ठेवा. या हॉटेलचे फोटो आणि इतर गोष्टींची पूर्णपणे माहिती करुन घ्या. होम स्टे असेल तर त्यांच्याशीही आधीपासून संपर्कात राहा.

२. प्रवासादरम्यान लोकांना भेटा, त्यांच्याशी ओळखीही करा पण तुमच्या राहण्याच्या ठिकाणाविषयी अनोळखी लोकांना सांगणे टाळाच.



३. तुमच्या प्रवासाशी निगडीत असणारी कागदपत्रे योग्य पद्धतीने, सुरक्षित ठिकाणी ठेवा. पासपोर्ट, तिकिटे यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो तुमच्या फोनमध्ये आणि मेलवर सेव्ह करा. जेणेकरुन तुमची बॅग हरवलीच तर तुमच्याकडे प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे असतील.

४. ज्याठिकाणी कामासाठी किंवा फिरण्यासाठी जाल त्याठिकाणी तुम्ही एकट्या आल्या आहात असे समोरच्याला समजणार नाही असे वागा. यासाठी वेगळ्या पद्धतीने आत्मविश्वासाने वागण्याची आवश्यकता आहे. हा आत्मविश्वास बाळगा.

५. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती साधने तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने स्प्रे, सेफ्टी अलार्म, एखादा लहान चाकू सोबत ठेवा. काही अडचण आल्यास तात्काळ वापरण्यासाठी याचा उपयोग होतो.



६. तुम्ही प्रवासासाठी नेलेले पैसे एकाच ठिकाणी ठेऊ नका. ३ ते ४ वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा. तसेच सामान्य जागांपेक्षा वेगळ्या जागांवर पैसे ठेवा. याशिवाय आवश्यक असतील तेवढीच रोख रक्कम सोबत ठेवा.

७. ज्याठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणाला शोभेल असेच कपडे घाला. जेणेकरुन तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाणार नाही.

८. तुम्ही ज्याठिकाणी जात आहात त्याठिकाणची जास्तीत जास्त माहिती करुन घेण्याचा प्रयत्न करा. भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीविषयी शक्य तितके जाणून घ्या. त्यामुळे तुमच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल.

Web Title: Travel Tips: Women should remember 'or' tips while traveling alone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.