आता भारतातील कोणत्याही शहरात स्वस्तात हॉटेल बुक करू शकता, IRCTC कडून शानदार संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 05:04 PM2023-05-23T17:04:59+5:302023-05-23T17:05:33+5:30
IRCTC Hotels Booking : थ्री स्टार ते फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या हॉटेल्सच्या रुम सुद्धा आपल्या रेंजनुसार निवडता येतील.
नवी दिल्ली : आकर्षक टूर पॅकेजसह आयआरसीटीसी (IRCTC) आता फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी आणखी एक शानदार भेट घेऊन आले आहे. ज्यामध्ये तुम्ही बजेटमध्ये भारतातील कोणत्याही शहरातील हॉटेल्स सहज बुक करू शकता. यासोबतच थ्री स्टार ते फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या हॉटेल्सच्या रुम सुद्धा आपल्या रेंजनुसार निवडता येतील. IRCTC ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि प्रवासापासून मुक्कामापर्यंत बजेट फ्रेंडली पर्याय शोधत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे. आता तुम्ही IRCTC द्वारे भारतातील कोणत्याही शहरात अतिशय स्वस्तात हॉटेल्स बुक करू शकता. ट्रेन, फ्लाईट किंवा बसने प्रवास करायचे निश्चित केल्यानंतर बहुतेक लोक हॉटेल्स बुक करतात, पण अनेक वेळा डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर रूम पाहून संपूर्ण मूड बिघडतो. त्यामुळे IRCTC ने या समस्येवर तोडगा काढला आहे.
यासाठी मोबाइल किंवा लॅपटॉपवर www.hotal.irctctourism.com वेबसाइट ओपन करा. याठिकाणी तुम्ही हॉटेलच्या रुम किंमतीसह पाहू शकता. तुम्ही या वेबसाइटवर लॉग इन करूनही ते बुक करू शकता. या वेबसाइटवर फक्त IRCTC रेल्वे तिकीट बुकिंग आयडी आणि त्याचा पासवर्ड काम करेल, परंतु तुमच्याकडे लॉगिन आयडी नसल्यास, तुम्ही रजिस्ट्रर करून तो तयार करू शकता.
बजेटनुसार हॉटेल निवडू शकता
हॉटेल्सचे दर पाहता तुम्ही तुमच्या बजेटनुसार हॉटेल निवडू शकता. संपूर्ण डिटेल्स वेबसाइटवर मिळेल. तारीख निवडल्यानंतर, बुकिंग ऑप्शनवर क्लिक करा. हॉटेलमध्ये थांबणार असलेल्या सर्व लोकांची माहिती भरल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करावे लागेल. यानंतर सबमिट टू बुक वर क्लिक करा. पेमेंटसाठी एक नवीन विंडो ओपन होईल. येथे तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआयआणि वॉलेटद्वारे हॉटेल बुकिंगसाठी पैसे देऊ शकता. हॉटेल बुक करण्यासाठी तुम्हाला https://www.hotel.irctctourism.com/hotel या लिंकवर जावे लागेल.