IRCTC Tour Package : अवघ्या 20 हजारात तुम्ही फिरू शकता महाराष्ट्र , टूर पॅकेजशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:01 PM2023-03-11T18:01:30+5:302023-03-11T18:01:56+5:30
IRCTC Tour Package : तुम्हीही राज्यातील विविध ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे.
महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त पर्यटन स्थळे आहेत. जिथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वन्यजीव प्रेमींसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही राज्यात ट्रेकिंगही करू शकता. तुम्हीही राज्यातील विविध ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. जाणून घ्या, या पॅकेजशी संबंधित महत्त्वाची माहिती...
पॅकेजचे नाव- मॅजेस्टिक महाराष्ट्र
पॅकेज कालावधी- 3 रात्री/4 दिवस
ट्रॅव्हल मोड - फ्लाइट
डेस्टिनेशन कव्हर्ड - शिर्डी, नाशिक, औरंगाबाद
'ही' सुविधा मिळेल
1. राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल.
2. 3 नाश्ता (Breakfast), 2 रात्रीच्या (Dinner) जेवणाची सोय असेल.
3. प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी एसी बसची सुविधा उपलब्ध असेल.
4. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळेल.
प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
1. या टूरमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 25,800 रुपये मोजावे लागतील.
2. तसेच, दोन लोकांना प्रति व्यक्ती 21,400 रुपये शुल्क द्यावे लागेल.
3. तीन लोकांना प्रति व्यक्ती 20, 900 रुपये शुल्क भरावे लागेल.
4. मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह (5-11 वर्षे) 19,550 आणि बेडशिवाय 15,800 रुपये मोजावे लागतील. बेडशिवाय 2-11 वर्षे वयोगटातील मुलासाठी 14,750 रुपये आकारले जातील.
IRCTC ने ट्विटद्वारे दिली माहिती
आयआरसीटीसीने (IRCTC) या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर तुम्ही आयआरसीटीसीच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
Discover the spirituality, ancient history, and rich heritage of different sites of Maharashtra in #irctc's #tour#package.
Book today, few seats left. https://t.co/orQn0BcbfM— IRCTC (@IRCTCofficial) March 10, 2023
असे करू शकता बुकिंग
तुम्ही या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही आयआरसीटीसी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.