हिंदी आणि गुजराती चित्रपटांच्या शूटींगचा भाग होता हा आलिशान महाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:38 PM2019-01-09T16:38:21+5:302019-01-09T16:39:51+5:30
'हम दिल दे चुके सनम' आणि 'लगान' यांसारख्या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेलं आलिशान घर पाहून अनेकांना त्याला भेट देण्याची इच्छा झालीच असेल.
'हम दिल दे चुके सनम' आणि 'लगान' यांसारख्या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेलं आलिशान घर पाहून अनेकांना त्याला भेट देण्याची इच्छा झालीच असेल. हा महाल कोणताही चित्रिकरणासाठी उभारलेला सेट नव्हता तर तो एकेकाळी राजा-महाराजांची शान म्हणून ओळखला जाणारा गुजरातमधील मांडवीमध्ये असणारा विजय विलास पॅलेस आहे. तुम्ही जर एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मांडवीमध्ये असलेला विजय विलास पॅलेस उत्तम पर्याय ठरतो. तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.
महालाचा इतिहास
विजय विलास पॅलेस महाराव विजयराजजींच्या शासनकाळामध्ये बांधण्यात आला होता. 1920मध्ये सुरू करण्यात आलेल्या या महालाची निर्मिती 1929मध्ये पूर्ण झाली होती. मांडवीमध्ये इंडो-यूरोपियन स्टाइलमध्ये तयार करण्यात आलेला हा महाल राजे-महाराजे उन्हाळ्यात करत असतं.
महालाचं सौंदर्य
महालाच्या आतमधील आणि बाहेरची रचना एवढी सुंदर आहे की, तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यापासून स्वतःला अजिबात थांबवू शकत नाही. याची रचना हुबेहुब ओरछा आणि दतिया महालांशी मिळती जुळती आहे. महालांच्या बाहेर तुम्ही राजपूताना आर्किटेक्चर अगदी सहज पाहू शकता. महालाच्या मध्यभागी एक मोठा गुबंद आहे आणि किनाऱ्यांवर बंगाल गुबंद आहे. रंगीत काचांवर करण्यात आलेलं नक्षीकाम फार सुंदर आहे. महालाची जाळी, झरोखे, छत्री, छज्जे, मुरल आणि रंगीत काचांवर करण्यात आलेलं नक्षीकाम जयपूर, राजस्थान, बंगाल आणि सौराष्ट्रमधून आलेल्या कामगारांच्या अलौकिक कामाचा नजराणा आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या कामगारांच्या कलेचा अद्भूत नजराणा म्हणजे हा महाल आहे. या महालाच्या पहिल्या मजल्यावर रॉयल फॅमिली राहत असे. लाल रंगाच्या दगडांनी तयार करण्यात आलेल्या या महालावर ज्यावेळी संध्याकाळच्या मावळत्या सुर्याची किरणं पडतात. त्यावेळी संपूर्ण महाल सोन्याप्रमाणे चमकून उठतो.
काही दिवसांपूर्वीच हा महाल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. हा महाल पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे, या महालाचं सौंदर्य आजही तसचं आहे. महालाचा एक हिस्सा रिसॉर्टमध्ये रूपांतरित करण्यात आला असून येथे पर्यटकांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा अस्तित्वात आहेत.
विजय विलास पॅलेस फिरण्यासाठी येणार असाल तर या गोष्टी लक्षात घ्या
वेळ - दररोज सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6.30 पर्यंत तुम्ही महालामध्ये फिरू शकता. त्याचबरोबर येथील प्रत्येक सुंदर गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकता. फोटो काढण्यासाठी सकाळची वेळ उत्तम ठरेल. यावेळी येथे गर्दी नसेल आणि सकाळच्या सुर्यकिरणांमध्ये तुम्हाला महालाची सुंदरता कॅमेऱ्यामध्ये कैद करणं सहज शक्य होईल.
कसे पोहोचाल?
भूजपासून अर्ध्या तासावर मांडवीसाठी जीप आणि बस असतात. शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या महालापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही टॅक्सिही बुक करू शकतात.
कुठे रहाल?
विजय विलास पॅलेसमध्ये एक हेरिटेज लक्जरी रिसॉर्टही आहे. जे समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला मांडवीमध्ये इतरही हॉटेल्स मिळतील.
एन्ट्री फी - 20 रूपये, कॅमेरा चार्ज - 50 रूपये.