'या' विदेशी ठिकाणी फिरण्यासाठी जास्त पैसे लागणार नाहीत, सरकार 'ही' सुविधा देते फ्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 03:27 PM2023-01-16T15:27:27+5:302023-01-16T15:28:11+5:30
आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फ्री आहे.
हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवताना सर्वात जास्त लक्ष बजेटकडे दिले जाते. कमीत कमी खर्चात उत्तम ट्रिप व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. ट्रान्सपोर्ट हा कोणत्याही ट्रिपचा महत्त्वाचा भाग असतो. ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला तर अतिशय कमी बजेटमध्ये चांगली सहल पूर्ण करता येईल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फ्री आहे.
कॅनडा
2012 पासून कॅनडातील चांबली आणि जवळपासच्या शहरांमध्ये फ्री ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आहे, असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
लक्झेंबर्ग
2020 पासून लक्झेंबर्गने येथील रहिवाशांसाठी फ्री ट्रान्सपोर्टची सुविधा सुरू केली आहे. पर्यावरणाच्या समस्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्थ, ऑस्ट्रेलिया
पर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये फ्री ट्रान्सपोर्टची सुविधा आहे, जरी बाहेरच्या शहरातून लोकांना पैसे द्यावे लागतात.
मॅरीहॅमन, फिनलँड
मॅरीहॅमनही अॅलँडची राजधानी आहे, जे एक स्वायत्त बेट आहे आणि फिनलँड प्रजासत्ताकच्या अंतर्गत येते. रिपोर्टनुसार, येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि रहिवाशांना फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा मिळते.
अवेस्ता, स्वीडन
स्वीडनच्या अवेस्ता शहरातही लोकांना फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा मिळते. अनेक वर्षांपासून येथे ही सुविधा दिली जात आहे.
याशिवाय, एस्टोनियातील टॅलिन, युकेमधील ड्यूसबरी, अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील क्लेमसन, क्लेमसन युनिव्हर्सिटी, पेंडलटन, सेंट्रल आणि सेनेका येथेही फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे.